सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1600 अंकांनी कोसळला

सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1600 अंकांनी कोसळला

कोरोनामुळे शेअर बाजारावर सलग चौथ्या दिवशीही परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 19 मार्च : कोरोनामुळे शुक्रवारपासून शेअर बाजाराला मोठा फटका बसला आहे. मागच्या आठवड्यात जवळपास शेअर मार्केतमध्ये मोठी घसरण झाली होती. या आठवड्यात सलग चौथ्या दिवशीही शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) चिंतेचे वातावरण आहे. सेन्सेक्स (Sensex) 1600 अंकांनी कोसळला आहे. 1,800 अंकांनी घसरून सेन्सेक्स 27.030 वर पोहोचला आहे. निफ्टी (Nifty50) 532 अंकांनी घसरून 7936 वर पोहोचली आहे. निफ्टीही तब्बल 500 अंकांनी घसरली आहे. कोरोनामुळे आंतरराष्ट्री आणि देशांतर्गत व्यापार आणि व्यवसायांवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक व्यावसाय ठप्प झाले आहेत.

बँकेची निफ्टी  8.3 टक्क्यांनी कोसळला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरल्यानं शेअर मार्केटवरही परिणाम झाला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र, त्याला नागरिकांची साथ देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना त्यांचं स्पिरीट दाखवण्याची वेळ आता आली आहे.

जीवनावश्यक वस्तूंचा, अन्नधान्य, औषधी यांचा साठा करू नये. राज्यातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व सुरळीत असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन जर कोणी व्यापारी साठेबाजी करीत असेल किंवा औषधांच्या, मास्कच्या किंमती अव्वाच्या सव्वा लावत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशीही माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे.

First published: March 19, 2020, 10:10 AM IST

ताज्या बातम्या