शेअर बाजारातली घसरण सुरूच; सेन्सेक्स 500 अंकानी गडगडला

शेअर बाजारातली घसरण सुरूच; सेन्सेक्स 500 अंकानी गडगडला

सकाळी शेअर बाजार सुरु होताच ५०० अंकांनी घसरुन ३३, ८९२ पर्यंत खाली आला. तर निफ्टीतही जवळपास १५० अंकांनी घसरण झाली

  • Share this:

09फेब्रुवारी:   शेअर बाजारातली घसरण सुरूच आहे. आज सकाळी मोठी घसरण झालीये. सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला तर निफ्टी 171 अंकांनी घसरला आहे.

सकाळी शेअर बाजार सुरु होताच ५०० अंकांनी घसरुन ३३, ८९२ पर्यंत खाली आला. तर निफ्टीतही जवळपास १५० अंकांनी घसरण झाली. गेले आठवडाभर अमेरिकी शेअर बाजारात झालेल्या विक्रीचा थेट परिणाम जगभरातल्या बाजारांवर पडला आहे. अर्थसंकल्पानंतरचा आठवडा शेअर बाजारासाठी तितकासा चांगला राहिलेला नाही. गेल्या आठवडाभरापासून शेअर बाजार सतत कोसळत असल्याचं दिसत आहे. गुरुवारीही शेअर बाजारात घसरण पहायला मिळाली होती. आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही शेअर बाजार मोठ्या घसरणीसोबत उघडला आहे. सेन्सेक्स जवळपास 550 अंकांनी घसरला असून, निफ्टीदेखील 150 अंकानी खाली आला आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टी 1.5 टक्क्यांच्या घसरणीसोबत सुरु आहेत. मार्केट सुरु होताच काही मिनिटात गुंतवणुकदारांना 2.24 लाख कोटींचा फटका बसला आहे. बीएसईचे 10 ते 8 स्टॉक्स रेड मार्कवर ट्रेड करत आहेत.

मग आता यामुळे याचा गुंतवणुकदारांना किती फटका बसतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2018 11:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading