Home /News /mumbai /

शरद पवारांचे राम मंदिराबद्दल वक्तव्य मुस्लिमांना खूश करण्यासाठी? प्रवीण दरेकरांची टीका

शरद पवारांचे राम मंदिराबद्दल वक्तव्य मुस्लिमांना खूश करण्यासाठी? प्रवीण दरेकरांची टीका

'अयोध्येत जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांच्या एनओसीची गरज लागणार नाही, ही अपेक्षा आहे'

मुंबई, 20 जुलै : राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांनी मुस्लिमांना खूश करण्यासाठी राम मंदिराबद्दल वक्तव्य केलं का? असा सवाल भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसंच, उद्धव ठाकरे यांना अयोध्येत जाण्यासाठी पवारांच्या एनओसीची गरज लागणार नाही, असा टोलाही दरेकरांनी लगावला. सोलापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपुजनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी  भाजपला टोला लगावला होता. काही लोकांना असं वाटतंय की, राम मंदिर बांधून देशातून कोरोना दूर होईल, अशा शब्दात पवारांनी नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता निशाणा साधला होता. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर भाजपचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना प्रत्तुत्तर दिले आहे. 'शरद पवारांनी राम मंदिराबद्दल जे काही वक्तव्य केले आहे, ते मुस्लीम समाजाला खूश करण्यासाठी केले तर नाही ना? हे पाहावे लागेल', असं दरेकर म्हणाले. तसंच,राम मंदिराच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. पण, अजून उद्धव ठाकरे यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. 'अयोध्येत जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांच्या एनओसीची गरज लागणार नाही, ही अपेक्षा आहे, असं म्हणत  दरेकरांनी पवारांना टोला लगावला आहे. 'शिवसेनापूर्वी आम्हाला म्हणत होती की, ‘मंदिर वही बनाएंगे, लेकिन तारीख नही बताएगें’ पण आता तर तारीख सांगितली आहे तेव्हा ते जातील अशी अपेक्षा आहे', असं म्हणत दरेकरांनी उद्धव ठाकरेंना आपल्या विधानाची आठवण करून दिली. त्याचबरोबर, संजय राऊत यांना पवारांची एनओसी लागते उद्धव ठाकरेंना लागेल असं वाटत नाही, असा टोलाही दरेकरांनी राऊत यांना लगावला आहे. पंतप्रधान मोदी फक्त जुमले बोलतात -राजीव सातव तर दुसरीकडे, 'प्रभू श्रीराम हे एकवचणी होते. मात्र, पंतप्रधान मोदी फक्त जुमले बोलतात. मंदिर बांधा पण जी प्रजा कोरोनाच्या विळख्यात आहे त्यांना यातून सोडवा' असं म्हणत काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी शरद पवार यांच्या विधानाचं समर्थन केले आहे. पंतप्रधान म्हणाले होते की, 15 लाख देणार मग आता जी कोरोनाची संख्या 15 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे हेच तर पंतप्रधान सांगत होते का?   कोरोनाच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करण्यासाठी तर मंदिराचे भूमिपूजन करीत नाही? असा सवालही सातव यांनी केला.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Ayodhya ram mandir, Pravin darekar, Ram Mandir, Sharad pawar

पुढील बातम्या