आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळेंचे निवडणूक प्रतिज्ञापत्र फेर पडताळणीवर पवारांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले...

आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळेंचे निवडणूक प्रतिज्ञापत्र फेर पडताळणीवर पवारांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले...

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्रांची फेरपडताळणी होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 22 सप्टेंबर : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि  राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्रांची फेरपडताळणी होण्याची शक्यता आहे. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही नोटीस मिळाली आहे. 'काही लोकं ऋणानुबंध  प्रेम अधिक आहे. त्यामुळे नोटीस देतात' असं म्हणत शरद पवारांनी मिश्किल टिप्पणी केली.

शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन कृषी विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राबद्दल पत्रकारांनी विचारले असता शरद पवारांनी आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली.

'आपल्याबाबत प्रेम असल्याने आनंद आहे. पहिल्यांदाच मला नोटीस आली, सुप्रिया यांना येणार आहे असे कळले, चांगली गोष्ट आहे.  संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे, याचा आनंद आहे', असा खोचक टोला पवारांनी लगावला.

कृषी विधेयकावरून महाविकास आघाडीत पडसाद, बाळासाहेब थोरात म्हणाले...

तसंच, 'मला सोमवारी नोटीस आली आहे. काही बाबतीत स्पष्टीकरण मागवलं आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून ही नोटीस मला आली आहे. त्याचे उत्तर लवकरच मी देईन, कारण उत्तर दिलं नाही तर दिवसाला 10 हजार दंड असल्याचा उल्लेख नोटीसमध्ये आहे. 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबतही नोटीस आहे, असंही शरद पवारांनी सांगितले.

'सगळ्या संसद सदस्यांमध्ये आम्हीच काही निवडक लोकं का निवडले जात आहोत. हे जरा विचार करण्यासारखे आहे. मुळात नोटीस येणे ही चांगली गोष्ट आहे. एकदा हातात कागदं आल्यावर नेमकं काय आहे ते कळेल. देशातील इतके लोकं संपर्कातले आहे. काही लोकं ऋणानुबंध  प्रेम अधिक आहे. त्यामुळे नोटीस देतात, असंही पवार म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांनी कृषी विधेयकावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसंच शेतकऱ्यांच्या आंदोलनात राष्ट्रवादी सहभागी असणार असल्याचे पवारांनी स्पष्ट केले.

'मोदी सरकारने एकाच वेळी दोन विधेयक मांडण्याची घाई का केली हे अद्याप कळू शकले नाही. हे विधेयक तातडीने मंजूर करावे यासाठी केंद्र सरकार आग्रही होते. त्यामुळे यावर चर्चा व्हावी अशी सदस्यांची अपेक्षा होती. पण तरीही मतदान घेऊन मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. पण सदनाचे काम रेटून नेण्याचे काम केले, अशी टीका शरद पवार यांनी केली.

'नियम दाखवून ही सदस्य यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे काहींनी वेगळी भूमिका घेतली. ऐकून घेण्याची अपेक्षा उपसभापती यांनी केली पाहिजे होती. पण तसं न करता आवाजी पद्धतीने मतदान करून बिल पास केले, त्याला सदस्यांनी प्रतिक्रिया दिली. पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ राजकारणात आहे. पण, पहिल्यांदाच असा प्रकार पाहिला', अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

'सर्व विचारांना तिलांजली देण्याचे काम पीठासीन यांच्याकडून झाले आहे. अर्थात त्याची प्रतिक्रिया म्हणून सदस्य गांधी पुतळा येथे आंदोलन करत आहे. उपाध्यक्षांनी  नियमांना महत्त्व न देता काम केले. सदस्यांनी अन्नत्याग भूमिका, त्यास पाठिंबा आहे. मी ही आज अन्नत्याग करणार आहे', असंही पवार यांनी सांगितले.

Published by: sachin Salve
First published: September 22, 2020, 1:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या