शरद पवारांची सावध भूमिका, अस्थिरता टाळण्यासाठी भाजप-शिवसेनेला दिला 'हा' सल्ला!

शरद पवारांची सावध भूमिका, अस्थिरता टाळण्यासाठी भाजप-शिवसेनेला दिला 'हा' सल्ला!

' राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत , काही दिवस राष्ट्रपती राजवट लागू शकते.'

  • Share this:

मुंबई 8 नोव्हेंबर : भाजप आणि शिवसेनेला लोकांनी पूर्ण बहुमत दिलं आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने अस्थिरता संपवावी आणि सरकार स्थापन करावं असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी शरद पवारांची भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते. अस्थिरता जास्त काळ राहणं योग्य नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे मित्र असलेले रामदास आठवले यांनी पुढाकार घेऊन दोघांमध्ये मध्यस्ती करावी असा सल्लाही त्यांनी दिली. राष्ट्रपती राजवट लागणं हे राज्यासाठी योग्य नाही असंही ते म्हणाले. अशी अस्थिर स्थिती या आधी फारशी कधी आली नव्हती असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

राज्यातला सत्तासंघर्ष आता निर्णायक टप्प्यात आला असून भाजप आणि शिवसेनेचे सूर जमत नसल्याने शरद पवार कुठली भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करावं असं शिवसेनेला वाटतं. मात्र काँग्रेस अजुनही उघडपणे पाठिंबा देण्यासाठी तयार नाही. त्यावर काँग्रेसमध्ये खल सुरू असून शिवसेनेला पाठिंबा द्यावा असं काँग्रेसच्या एका गटाला वाटतं त्यामुळे पुढचे 24 तास हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत , काही दिवस राष्ट्रपती राजवट लागू शकते.

मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना 3 वेळा फोन, मातोश्रीवरून मिळालं असं उत्तर!

...भाजप विरोध पक्षात बसणार

भाजप आणि शिवसेनेमध्ये जो पेच निर्माण झालाय त्यात नितीन गडकरींनी मध्यस्ती करावी असा आग्रह धरला जातोय. पण नितीन गडकरींनीच अनेकदा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील आणि महायुतीच सरकार येईल असं म्हटलंय. त्यामुळे शिवसेना गडकरींच्या मध्यस्तीसाठी तयार होईल का याबद्दल शंका व्यक्त केलीय जातेय. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते विनोद तावडे यांनी आज मुंबईत नितीन गडकरींची भेट घेतली. या भेटीनंतर विनोद तावडे यांनी महत्त्वाचं आणि सूचक वक्तव्य केलंय. त्यामुळे पेच आणखीच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.विनोद तावडे म्हणाले, शिवसेनेला काही प्रस्ताव दिले आहेत. आता कोणता प्रस्ताव स्वीकारावा याचा निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे.

संभाजी भिडेंची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, राजकीय समीकरणांवर खलबतं?

ते पुढे म्हणाले, आमच्या कडे उद्यापर्यंतचा वेळ आहे. त्यानंतर राज्यपालांनी आम्हाला बोलावलं तर आम्ही आमच्याकडे बहुमत नाही असं त्यांना सांगू. नंतर राज्यपाल शिवसेनेला बोलावतील. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तेत आली तर आम्ही विरोधी पक्षात बसायला तयार आहोत. पण असा निर्णय घेणं हा शिवसेनेसाठी मोठा धक्का असेल असंही त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेत बोलताना सांगितलं.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणं हे शिवसेनेला परवडणारं नाही, याची जाणीव शिवसेनेलाही आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी ते आमच्यासोबत येतील असा विश्वासही तावडे यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2019 03:27 PM IST

ताज्या बातम्या