मुंबई, 13 मार्च: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेली भविष्यवाणी खोटी ठरणार असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. कालच शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असे वक्तव्य केले होते. त्यावर उत्तर देताना महाजन यांनी पवाराचींची भविष्यवाणी खोटी ठरणार असे सांगितले.
शरद पवारांनी याआधी 2014मध्ये अशीच भविष्यवाणी केली होती. तेव्हा त्यांची भविष्यवाणी खोटी ठरली होती. आता देखील त्यांची भविष्यवाणी खोटी ठरणार असल्याचे महाजन म्हणाले. खुद्द पवारांना गृहकहलामुळे मतदारसंघ मिळत नाही. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत. दरम्यान, विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देणार असे मला खुद्द राधाकृष्ण विखे पाटीलांनीच मला सांगितले होते महाजन यांनी सांगितले.
काय म्हणाले होते पवार
लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असे भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. भाजप सरकार विरोधात येत्या 14 तारखेला केंद्रातील सर्व घटक पक्ष निवडणुकीच्या मुद्यावर चर्चा करणार असल्याचे पवारांनी सांगितले. बुधवारी होणाऱ्या या बैठकीला मी स्वत: जाणार असल्याचे ते म्हणाले. मुंबईत एका कार्यक्रमात ते बोलत होते.
निवडणुकीनंतर भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप असेल पण त्यांना स्वबळावर सत्ता मिळणार नाही. अशा परिस्थितीत पंतप्रधानपदासाठी त्यांना हवा तो उमेदवार देता येणार नाही. मी काही ज्योतिषी नाही पण या निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान होणार नाहीत असे देखील पवार म्हणाले.