Home /News /mumbai /

शॅडो कॅबिनेटवरून शरद पवारांचा मनसेला टोला, म्हणाले...

शॅडो कॅबिनेटवरून शरद पवारांचा मनसेला टोला, म्हणाले...

'एखाद्या पक्षाने सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी काही केले असेल तर चांगले आहे'

    मुंबई,  09 मार्च : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 14 वा वर्धापन दिन नवी मुंबईत साजरा झाला. या कार्यक्रमात शॅडो कॅबीनेट संदर्भात महत्वाची घोषणा करण्यात आली. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मनसेच्या या कॅबिनेटवरून टोला लगावला आहे. शरद पवार यांनी आज राज्यसभेसाठी खासदारकीचा अर्ज भरला. अर्ज दाखल केल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडी आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर नजर ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेट स्थापन केली आहे, असा सवाल विचारला असता, शरद पवार यांनी मनसेच्या या भूमिकेवर टोला लगावला आहे.  'एखाद्या पक्षाने सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी काही केले असेल तर चांगले आहे. मुळात काही तरी केले पाहिजे आणि लोकांसमोर गेले पाहिजे', असा टोला पवारांनी मनसेला  लगावला. 'ज्योतिरादित्य यांच्या समवेत चर्चा संवाद व्हायला हवा होता' 'मध्य प्रदेशात सरकार हे गेले नाही. कमलनाथ यांच्या कर्तृत्वावर लोकांना विश्वास आहे. ते काही करू शकतात का बघावे लागेल. परंतु, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समवेत चर्चा संवाद व्हायला हवा होता. कदाचित तिथ कमी काही झाले असावे', असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. तसंच, 'काँग्रेस पक्षामध्ये नेतृत्व आहे, कर्तृत्त्व ही आहे आणि भविष्यही आहे', असंही पवार सांगायला विसरले नाही. 'राज्यात वेगळं काही घडणार नाही' यावेळी, पत्रकारांनी मध्य प्रदेशसारखी परिस्थिती  महाराष्ट्रात उद्भवणार का असा प्रश्न विचारला असता, शरद पवारांनी आपल्या शैलीत याचे उत्तर दिले.  'मध्य प्रदेशात पडसाद महाराष्ट्रात स्थिती काही येणार नाही. महाराष्ट्र मला राजकीय स्थितीची जाण आहे. त्यामुळे मला वाटते इथं वेगळं काही घडेल असं वाटत नाही', असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. 'महाविकास आघाडीला 100 टक्के मार्क्स' तसंच, 'महाविकास आघाडीला  100 दिवस पूर्ण झाले आहे. 100 दिवसांमध्ये जे काम झालं ते चांगल्या प्रकारे झालं आहे. असं सांगत शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या 100 दिवसाच्या कारभाराला 100 टक्के मार्क्स दिले आहे. शिवसेनेचा मनसेचा टोला मनसेनं जर यातून विधायक सूचना करण्यासाठी हे केलं असेल तर त्यांच्या सूचनांचा आम्ही विचार करू. मात्र, राजकारणासाठी हे काम असेल तर मात्र आम्ही त्याला महत्त्व देणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे मंत्री आणि नेत अनिल परब यांनी दिली होती. 'राज्याच्या विकासासाठी जे कुणी विधायक सूचना करतील त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही त्याचा विचार करू आणि त्या घेता येतील का ते पाहू मात्र, विरोधासाठी विरोधाला किंमत देत नाही', असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. असं आहे मनसेचं शॅडो कॅबिनेट दरम्यान, 9 मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त नवी मुंबईतील मेळाव्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शॅडो कॅबिनेटची घोषणा  करण्यात आली. यात पक्षाच्या महत्त्वाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना सामावून घेण्यात आलं आहे. येत्या एप्रिलमध्ये नवी मुंबईत महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करून आपला भगवा झेंडा राज्यभर नेऊया, असं आवाहन बाळ नांदगावकर यांनी यावेळी बोलताना केलं. वित्त आणि गृहनिर्माण - नितीन सरदेसाई जलसंपदा अनिल शिदोरे गृह, विधी व न्याय, सामान्य प्रशासन बाळा नांदगावकर महसूल आणि परिवहन - अविनाश अभ्यंकर सहकार आणि पणन - दिलीप धोत्रे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण - रिटा गुप्ता शालेय उच्च शिक्षण - अभिजित पानसे नगर विकास आणि पर्यटन - संदिप देशपांडे , अमित ठाकरे कामगार - राजेंद्र वागसकर , गजानन राणे , सुरेंद्र सुर्वे वने आपत्ती व्यवस्थापन , मदत पुनर्वसन - अमित ठाकरे , संजय चित्रे , संतोष धुरी ग्रामविकास - अमित ठाकरे उर्जा - शिरीष सावंत , सागर देवऱह सांस्कृतिक कार्य - अमेय खोपकर रोजगार हमी आमि फलोत्पादन - बाळा शेडगे सार्वजनिक उपक्रम - संजय शिरोडकर सार्वजनिक बांधकाम - योगेश परुळेकर सामाजिक न्याय - गजानन काळे महिला बालविकास - शालिनी ठाकरे , सुनीता चुरी अन्न नागरी पुरवठा - राजा चौघुले उत्पादन - वसंत फडके आदिवासी विकास - आनंद एंबडवार पर्यावरण - रुपाली पाटील, किर्तीकुमार शिंदे, देवव्रत पाटील पाण पुरवठा - अरविंद गावडे केतन जोशी - सामान्य प्रशासन आणि इतर महत्त्वाचे विभाग

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: MNS, Mumbai, Raj Thackery, Sharad pawar

    पुढील बातम्या