Home /News /mumbai /

शरद पवार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, केली 'ही' मागणी

शरद पवार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, केली 'ही' मागणी

याआधीही शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून राज्यासाठी आणि शेतकरी वर्गासाठी मदतीची मागणी केली होती.

    मुंबई, 28 मे : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे परिस्थितीत चिंताजनक आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. शरद पवार यांनी आपल्या पत्रात बांधकाम क्षेत्रासाठी मदत आणि राज्यासाठी मदतीची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. शरद पवार यांनी आपल्या अधिकृत सोशल अकाउंटवर हे पत्र प्रसिद्ध केले आहे. 'रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा फटका बसला आहे.  जवळपास तीन महिन्यांपासून रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी पडझड झाली आहे. मजूर नसल्यामुळे कामं ठप्प झाली असून विक्री नसल्यामुळे व्यवहारही ठप्प झाले आहे.  राष्ट्रीय जीडीपीला हातभार लावण्यासाठी मोठा वाटा असणाऱ्या या उद्योगाला फटका बसला आहे' असं शरद पवार यांनी या पत्रात म्हटलं आहे. कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (CREDAI) देखील या संदर्भात एक पत्र लिहिले असून त्वरित हस्तक्षेपाची विनंती सरकारकडे केली आहे. त्यामुळे या क्षेत्राला तातडीने मदत करण्यासाठी पुनर्रचना, अतिरिक्त निधी आणि जीएसटीबाबत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींकडे मागणी केली आहे. हेही वाचा -मौन सोडा जनतेसाठी बोला, प्रियांका गांधींची मोदींवर टीका; फडणवीसांनाही सुनावलं याआधीही शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून राज्यासाठी आणि शेतकरी वर्गासाठी मदतीची मागणी केली होती. दरम्यान, शरद पवार यांनी पंतप्रधानांना पत्रव्यवहार केल्यामुळे भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र लिहावे, अशी मागणी केली होती. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: NCP, Pm modi, Sharad pawar, शरद पवार

    पुढील बातम्या