मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Shivsena vba alliance : शरद पवारांसोबत जुनं भांडण, पण..., युती होताच आंबेडकरांची NCP ला साद

Shivsena vba alliance : शरद पवारांसोबत जुनं भांडण, पण..., युती होताच आंबेडकरांची NCP ला साद

बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो आहे, याची घोषणा केली आहे, आता निवडणुकीमध्ये बदलाचे राजकारण सुरू होईल.

बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो आहे, याची घोषणा केली आहे, आता निवडणुकीमध्ये बदलाचे राजकारण सुरू होईल.

बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो आहे, याची घोषणा केली आहे, आता निवडणुकीमध्ये बदलाचे राजकारण सुरू होईल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 जानेवारी : 'शरद पवार यांची प्रतिक्रिया वाचली, आमचं फार जुनं भांडण आहे. शेजारचं भांडण नाही, नेतृत्वाचं भांडण नाही, विषयाचं भांडण आहे. आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा बाळगतो, असं म्हणत वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीच्या आक्षेपावर प्रतिक्रिया दिली.

शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज डॉ. आंबेडकर भवन इथं संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो आहे, याची घोषणा केली आहे, आता निवडणुकीमध्ये बदलाचे राजकारण सुरू होईल. जाहीरनाम्यामध्ये मंडल आयोग हे आम्ही लागू करू अशी घोषणा होती. दुर्दैवाने त्यावेळी होऊ शकले नाही. गेली अनेक वर्ष उपेक्षितांचे राजकारण झाले आहे, यासाठी आम्ही चळवळ सुरू केली. पण ही चळवळ गिळण्याचा प्रयत्न झाला. आम्ही लढत राहिलो. उमेदवार निवडून येणे हे पक्षाच्या हातात नसून लोकांच्या हातात आहे. त्याला उमेदवारी देणे हे पक्षाचे काम आहे, असं यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले.

(...तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला)

नातेवाईकांचे राजकारण जसे वाढत गेले, तसे महाराष्ट्रात गरिबांचे राजकारण बाजूला पडले. भांडवलशाही आणि लुटारूचे राजकारण सुरू झाले आहे. एकेकाळी अर्थव्यवस्थेमध्ये मोठाल्या उद्योगांची गरज होती. पण शेतीची प्रक्रिया करणारे उद्योग याची आपण चर्चा करत नाही. सर्वात जास्त रोजगार देणारे कार सेक्टर हे सर्वसामन्याच्या हातात गेले पाहिजे, भांडवलदारांच्या हातात नाही. दावोसला जाऊन आला तिथे करार होता, पण त्यावर काम करणारी प्रक्रिया उभी राहिली तर रोजगार निर्माण होती, असंही आंबेडकर म्हणाले.

(...मग आमच्यासोबत युती का केली? चंद्रकांत खैरेंचा फडणवीसांवर पलटवार)

शरद पवार यांची प्रतिक्रिया वाचली, आमचं फार जुनं भांडण आहे. शेजारचं भांडणं नाही, नेतृत्वाचं भांडण नाही, विषयाचं भांडण आहे. आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा बाळगतो, असं म्हणत आंबेडकर यांनी राष्ट्रवादीच्या वादावर प्रतिक्रिया दिली.

'आज ईडीच्या मार्फत देशातील राजकीय नेतृत्व संपवले जात आहे. त्याने खरंच पैसे खाले असेल तर त्याला जेलमध्ये घेऊन जा, कोर्ट त्याला शिक्षा देईल. पण कोर्टात जायचं नाही आणि फक्त नेतृत्वावर जो आक्षेप आहे, प्रतिमा डागळण्याचा जो भाग आहे. तो हा धोकादायक प्रकार आहे, आपण काय अमरपट्टा घेऊन आलो नाही. एक दिवस नरेंद्र मोदी यांचा सुद्धा अंत होणार आहे. त्यांनी सुद्धा त्यांच्या पक्षात लिडरशीप संपवली आहे. वरती कुणालाच येऊ दिलं नाही, अशी टीकाही आंबेडकर यांनी केली.

First published:

Tags: Prakash ambedkar, Sharad Pawar