मुंबई, 12 ऑगस्ट : पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादी पक्षात शरद पवार यांचा शब्द हा कायम अखेरचा मानला जातो. त्यांनी जी भूमिका घेतली तीच इतर नेत्यांची असते. परंतु, अनेक वादांमुळे चर्चेत असलेल्या सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नातू पार्थ पवारांनी वेगळीच पक्षाच्या बाहेर जाऊन भूमिका मांडली. त्यामुळे शरद पवार नाराज झाले आणि चांगलेच नातवाचे कान उपटले.
'मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीचीही किंमत देत नाही', असं सांगून शरद पवारांनी अखेर आपल्या बंडखोर पार्थ नातवाला जाहीरपणे फटकारले. पण पवार आजोबा आणि नातवामधला हा वाद काही आजचा नाही. याआधीही शरद पवारांनी नाराजी बोलून दाखवली होती.
बीड हादरलं, अवघ्या 13 तासात 6 रुग्णांचा मृत्यू
लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच आजोबा आणि नातवाच्या वादाला तोंड फुटले आहे. मावळमधून पार्थच्या उमेवारीलाही पहिला रेड सिग्नल हा आजोबा पवारांनीच दाखवला होता.
'घरच्यांनीच निवडणुका लढवायच्या तर कार्यकर्त्यांचं काय? असा सवाल उपस्थित करत शरद पवारांनी त्यावेळी विरोध दर्शवला होता.
पण पवारांनी जाहीर विरोध करुनही पुढे सरतेशेवटी पार्थला मावळमधून उमेदवारी द्यावीच लागली. त्यासाठी मग पवारांना माढ्यातून माघार घ्यावी लागली होती. पण, निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतरही मावळामधून पार्थ पवार पराभूत झाले.
'देव पुन्हा एकदा त्याची परीक्षा घेतोय..',संजय दत्तच्या पत्नीची भावुक प्रतिक्रिया
तर दुसरीकडे विधानसभेला पवारांचाच दुसरा लाडका नातू रोहित कर्जतमधून मोठ्या मताधिक्याने विजयी झाला. पवारांनी रोहित आणि आपल्यात थोडासा दुजाभाव केल्याची भावना पार्थ मनात ही तेव्हापासूनच बळावल्याचं बोललं जातं. किंबहुना विधानसभा निकालानंतर अजित पवारांच्या बंडखोरीवेळी त्यांचं सोशल अकाऊट हे पार्थनेच सांभाळल्याची चर्चा त्यावेळी जोरावर होती. पुढे अजित पवारांचं बंड शरद पवारांनी कसं शमवलं हे सर्वानांच ठाऊक आहे. पण गप्प बसेल तो पार्थ कसला, गृहखातं राष्ट्रवादीकडेच आहे हे माहित असूनही या पठ्ठ्याने सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची थेट सीबीआय चौकशीचीच मागणी करून मोठी खळबळ उडवून दिली.
सुशांतच्या वडिलांबद्दल केलेल्या दाव्यावर संजय राऊतांचे मोठे विधान, म्हणाले...
एवढंच नाहीतर आपल्याच आजोबांविरोधात 'जय श्रीराम'चा एल्गार पुकारला. पार्थ पवारांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल ट्वीट केले होते. विशेष म्हणजे, या ट्वीटमध्ये त्यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनाही टॅग केले होते. एकीकडे शरद पवारांनी राम मंदिराबद्दल केलेले वक्तव्य आणि दुसरीकडे पार्थ यांनी घेतलेली भूमिका नेमकी पवारांच्या भूमिकेला छेद देणारी होती.
विशेष म्हणजे पार्थ पवारने ही दोन्ही पञ स्वत:च्या लेटर पॅडवर दिली. त्यात राष्ट्रवादीचे नामोल्लेखही नाही. त्यामुळे उद्या जर समजा बारामतीचं पवार घराणं फुटलं तर त्याला हा बंडखोर पार्थच कारणीभूत असणार हे सांगायाला पवारांच्या भाषेत कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही.