• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये सह्याद्रीवर चर्चा; बैठकीत भेटीमागे दडलंय काय?

मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये सह्याद्रीवर चर्चा; बैठकीत भेटीमागे दडलंय काय?

Sharad Pawar and CM Uddhav Thackeray meeting: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होत आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 सप्टेंबर : राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) हे सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhv Thackeray) यांच्यासोबत शरद पवारांची बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आता सह्याद्रीवर राज्यातील शाळांमध्ये डिजिटल शिक्षण देण्यासंदर्भात सादरीकरण होत आहे. यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) चे सादरीकरण सह्याद्री अतिथीगृह येथे सुरू असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित आहेत. राज्यातील शाळांमध्ये डिजिटल शिक्षण (digital education in Shools) देण्यासंदर्भात सादरीकरण झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात एक बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी मुख्यमंत्री दिल्लीच्या दौऱ्यावर (CM Uddhav Thackeray delhi tour) आहेत. या दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात होत असलेल्या बैठकीला फार महत्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या राष्ट्रीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यासोबतच इतरही राज्यांचे मुख्यमंत्री उपस्तित राहणार आहेत. राजकीय बैठक होणार? या बैठकीच्या संदर्भात संजय राऊत यांनी म्हटलं, बैठकीत इतरही राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या मुख्यमत्र्यांची बैठक गृहमंत्र्यांनी बोलावली आहे. ज्या राज्यांत नक्षलवाद्यांचा त्रास आहे अशा राज्यांच्या मुख्यमत्र्यांसोबत बैठक आहे. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत राजकीय बैठक होणार आहे का? अनंत गिते यांनी केलेल्या वक्तव्यावर चर्चा? शिवसेनेचे माजी खासदार अनंत गिते यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि राष्ट्रवादीवर थेट निशाणा साधला होता. यावर मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात चर्चा होणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. नेमकं काय म्हणाले अनंत गिते? रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात राष्ट्रवादीतील काही स्थानिक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमात भाषण करताना अनंत गिते यांनी थेट राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. अनंत गिते यांनी म्हटलं, मला जाणीव आहे की शिवसेनेचा नेता या व्यासपीठावरुन बोलतोय. मी आज कोणतंही राजकीय भाष्य करणार नाहीये. शिवसेना काय आहे आणि शिवसैनिकांची जबाबदारी काय हे सांगत आहे. राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्मयंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस, राष्ट्रवादी आपले नाहीत. आघाडीचं सरकार आहे. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील, तुमची आमची जबाबदारी काय आहे तर गाव सांभाळायचं आहे. आपलं गाव सांभाळायच असताना आम्हाला आघाडीचा विचार करायचा नाहीये... आघाडी आघाडीचं पाहून घेईल. शिवसेना ही काँग्रेसच्या विचाराची कदापी होऊ शकणार नाही या आघाडीत तीन घटक आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा काँग्रेसच आहे. हे एकमेकांचे तोंज पाहत होते का, यांचं एकमेकांचं जमतय का, यांचा विचार एक आहे का? दोन काँग्रेस एक विचाराची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेसच्या विचाराची कदापी होऊ शकणार नाही असंही अनंत गिते म्हणाले. राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून अनंत गिते पुढे म्हणाले, मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. मग त्या दोन काँग्रेस जर एक होऊ शकत नाही तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणं कदापी शक्य नाही. जरी राज्यात आघाडी सरकार असलं तरी आम्ही आघाडी सैनिक नाही आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिकच राहणार. दुसरा कुठलाही नेता त्याला कुणीही किती उपाधी देवो, कुणी जाणता राजा म्हणो.. कुणी आणखी काय म्हणो... पण आणचे गुरू तो होऊ शकत नाही. आमचे गुरू केवळ बाळासाहेब ठाकरे आहेत. ही आघाडी केवळ सत्तेची तडजोड आहे. ज्या दिवशी तुटेल त्या दिवशी तुम्ही आपल्याच घरी येणार. आपलं घर भक्कम करण्यासाठी आपल्याला ताकद वाढवायची आहे असंही अनंत गिते म्हणाले.
  Published by:Sunil Desale
  First published: