शरद पवार धडकणार उद्या ED च्या ऑफिसवर, प्रशासनाची जमावबंदी

शरद पवार धडकणार उद्या ED च्या ऑफिसवर, प्रशासनाची जमावबंदी

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी EDच्या ऑफिसजवळ येऊ नये आणि शांतता राखावी असं आवाहन शरद पवारांनी केलंय.

  • Share this:

मुंबई 26 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी ED च्या ऑफिसला जाणार असून काय चौकशी करायची ते करा असं ते ED ला सांगणार आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी EDने पवारांसहीत 70 नेत्यांवर गुन्हे दाखल केले होते. शरद पवार ED ऑफिसवर येणार असल्याने राष्ट्रवादीचे सर्व नेते मंडळीही मुंबईत असणार असून अनेक कार्यकर्तेही पवारांसोबत EDच्या ऑफिसवर धडकणार आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पवारांना पाठिंबा देण्यासाठी सोशल मीडियावर कॅम्पेन चालवत आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी EDच्या ऑफिसजवळ येऊ नये आणि शांतता राखावी असं आवाहन शरद पवारांनी केलंय.

सहकारी साखर कारखान्यांना कर्ज वितरणात अनियमितता असल्याचा आरोप आहे.

शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब..असा असेल नवा फॉर्म्युला, 'हे' पद सेनेकडे?

कमकुवत आर्थिक स्थिती असूनही सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर करण्यात आली होती. बऱ्याच प्रकरणांमध्ये कोणत्याही तारणविना कर्ज मंजूर केले गेलं होतं. सहकारी साखर कारखाने आजारी पडल्यानंतर चुकीच्या पद्धतीने फायदा घेण्यासाठी अतिशय कमी किमतीत ते विकण्यात आली होती. सहकारी साखर कारखाने काही विशिष्ट राजकारण्यांच्या जवळच्या नातेवाईकांना विकण्यात आले होते. त्यावरून प्रचंड आरोप-प्रत्यारोप झाले होते. आता निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यावर हे गुन्हे दाखल झाल्याने राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

काय आहे राज्य सहकारी बँकेचा घोटाळ्याचा आरोप?

- 2005 ते 2010 या कालावधीत राज्य सहकारी बँकेवर वर्चस्व असणाऱ्या संचालक मंडळांनी नियमबाह्य कर्जाचे वितरण केलं.

- राज्यातल्या अनेक सहकारी साखर कारखाने सूतगिरणी मिल यासह अनेक सहकारी संस्थांना कर्जाचं वाटप केलं गेलं.

SPECIAL REPORT :..आणि 10 महिन्याच्या चिमुरड्याने पुण्यात पुराची मगरमिठ्ठी भेदली

- हे सर्व कर्ज नियमबाह्य पद्धतीने दिले गेले. साधारण त्याची रक्कम पंधराशे कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

- अजित पवारांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव पाटील राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना बहुतेक कर्ज दिले गेले. यावरून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली.

- राज्य सहकारी बँकेला या सर्व प्रकरणामुळे आर्थिक नुकसान तर झालेच पण स्वतःच्या सहकारी संस्थांसाठी नियमबाह्य कर्ज देत मोठ्या प्रमाणात फायदा मिळवल्याचा आरोप या याचिकेत केला गेला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 26, 2019, 9:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading