'या तीन नेत्यांच्या हातात आहे महाराष्ट्राच्या सत्तेचं भवितव्य'

'या तीन नेत्यांच्या हातात आहे महाराष्ट्राच्या सत्तेचं भवितव्य'

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विश्वासावर शिवसेना NDAमधून बाहेर पडली मात्र सत्ता स्थापनेचं अजुन काहीच ठरेना. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नुसत्या चर्चाच सुरू आहेत.

  • Share this:

मुंबई 17 नोव्हेंबर : बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस अभिवादन करण्याकरता ठाण्याहून शेकडो शिवसैनिकांसह माजी मंत्री एकनाथ शिंदे यांनी रेल्वे ने प्रवास केला. ठाण्यातून शिवसैनिकांसह ते दादरला पोहोचले आणि शिवाजी पार्क इथल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीवर त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. शिंदे म्हणाले, बाळासाहेबांचे विचार संपूर्ण भारतात मानले जातात त्यांचे विचार अनेकांसाठी प्रेरणादायक आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी हे महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेचा निर्णय घेतील असा खुलासाही त्यांनी केला. लवकरच याबाबत चित्र स्पष्ट होईल असंही ते म्हणाले. भाजपने सत्ता स्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपालांनी दिलेलेल्या वेळेत शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची पत्र देता आली नव्हती. त्यामुळे राजभवनातून सर्व नेत्यांना रिकाम्या हातांनी परत यावं लागलं होतं.

तेव्हापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नुसत्या चर्चाच सुरू असून त्यातून काहीही ठोस निघत नसल्याचं स्पष्ट होतेय. संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवार 18 नोव्हेंबरपासून सुरू होतेय. त्या दरम्यान 19 तारखेला शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट होणार आहे. त्या भेटीत निर्णय होण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय.

शिवसेनेची चिंता वाढली; अजित पवार म्हणतात, सत्तावाटपाचं काहीच ठरलेलं नाही

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विश्वासावर शिवसेना NDAमधून बाहेर पडली मात्र सत्ता स्थापनेचं अजुन काहीच ठरेना. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नुसत्या चर्चाच सुरूच असून त्यातून अजुनतरी काहीही ठोस निघण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे शिवसेनेची चिंता वाढलीय. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यामुळेही आता शिवसेनेच्या चिंतेत वाढ झालीय. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं अजुन काहीही ठरलेलं नाही. असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. माध्यमांनी उगाच नको त्या चर्चा करून नये असंही ते म्हणाले. अजित पवार म्हणाले, आमदार फुटण्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही.

अनेकजण पहिल्यांदाच निवडून आलेले असल्याने फुाटाफूट होणार नाही. काहींनी पक्ष सोडल्यावर काय निकाल लागतो हे साताऱ्यात सगळ्यांना दिसलंय. त्यामुळे आता कुणी असं करणार नाही. कर्नाटकचा निकाल काय लागला हेही जनतेने पाहिले आहे. जर कुठल्या पक्षाने कुठल्या पक्षाचे आमदार फोडले तर इतर तिन्ही पक्ष एकत्र येवून त्यांचा पाडाव करतील.

 देवेंद्र फडणवीसांनी टाळली उद्धव ठाकरेंची भेट

काही फॉर्म्युला ठरला याबद्दलच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. अद्याप काहीही ठरलेलं नाही. याबद्दल त्या त्या पक्षाचे सर्वोच्च नेते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत या सगळ्या वावड्याच आहेत. आता 19 नोव्हेंबरला सोनिया गांधी आणि पवारसाहेबांची भेट होईल. त्यानंतर सगळे चित्र स्पष्ट होईल.

अजित पवार पुढे म्हणाले, सध्या शेतकऱ्यांना दिलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे. प्रत्यक्ष नुकसान पाहून मदत दिली पाहिजे. सध्या राष्ट्रपती राजवट आहे. त्यामुळे सगळे निर्णय केंद्रातून होतात. या पार्श्वभूमीवर आमचे सगळे खासदार याबद्दल केंद्रात आवाज उठवून शेतकऱ्यांना दिलासा देतील.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 17, 2019, 6:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading