Home /News /mumbai /

शरद पवारांच्या निवासस्थामागे कोरोनाचा कहर, एकाच वेळी तब्बल 9 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

शरद पवारांच्या निवासस्थामागे कोरोनाचा कहर, एकाच वेळी तब्बल 9 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पावर यांच्या निवासस्थानापर्यंत कोरोनाचा शिरकाव झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबई, 17 ऑगस्ट : राज्यात कोरोनाचा हाहाकार दिवसेंदिवस वाढतच आहे. अशात मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सगळ्यात जास्त आहे. कोरोनाच्या संसर्गाने राज्यात राजकीय नेते ते सर्वसमान्यांपर्यंत सगळ्यांना वेढलं आहे. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पावर यांच्या निवासस्थानापर्यंत कोरोनाचा शिरकाव झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'सिल्व्हर ओक'वर 2 जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आणखी काहींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक बांगल्यावरील कर्मचारी आणि या बंगालच्या पाठीमागे असलेल्या कर्मचारी चाळीत महापालीकेन करोना चाचणी घेण्यात काम सुरू केलं आहे. आतापर्यंत 40 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातील 9 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अधिक माहितीनुसार, अजूनही या भागात राहणाऱ्यांची कोरोनाची चाचणी सुरू आहे. तर काही लोकांचे उर्वरित तापनसनी अहवाल येणं अद्याप बाकी आहेत. ते आज रात्री येणं अपेक्षित आहेत. तर परिसरातील टेस्ट उद्यापर्यंत चालू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचे दिग्गज पंडित जसराज यांचं निधन शरद पवार यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एकूण सहा जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. रॅपिड टेस्टमध्ये यातील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील कोणीही शरद पवारा यांच्या संपर्कात नव्हते, अशीही माहिती आहे. शरद पवार भेट टाळणार? थेट सिल्व्हर ओकवरील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विशेष खबरदारी घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवार पुढील काही दिवस कुणालाही भेटणार नसल्याचं समजते. Weather Alert: पुढचे 48 तास राज्यासाठी धोक्याचे, हवामान खात्याने दिला इशारा पवारांचे राज्यव्यापी दौरे राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर काही काळ शरद पवार यांनी घरीच थांबणं पसंत केलं होतं. मात्र अनलॉक प्रक्रिया सुरू होताच आणि राज्यातील कोरोनाचं संकट गडद होताच शरद पवार यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. पवार यांनी राज्यभरातील विविध शहरांमध्ये जात कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. तसंच स्थानिक नेते आणि प्रशासनाला याबाबत सूचना दिल्या. सुप्रिया सुळेंना आव्हान देणाऱ्या कांचन कुलांवर नवी जबाबदारी, पुण्यात मिळालंं पद या संपूर्ण दौऱ्यात शरद पवार यांच्यासोबत अनेक लोकांचाही वावर होता. मात्र निवासस्थानावरीलच काही व्यक्त कोरोनाबाधित झाल्यामुळे शरद पवार हे पुढील काही दिवस बैठका टाळतील, अशी शक्यता आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Coronavirus, Sharad pawar

पुढील बातम्या