Home /News /mumbai /

शरद पवारांनी पुढाकार घ्यावा, मेट्रो कारशेडच्या वादावर सेनेच्या मंत्र्याची मागणी

शरद पवारांनी पुढाकार घ्यावा, मेट्रो कारशेडच्या वादावर सेनेच्या मंत्र्याची मागणी

' मेट्रो कारशेडसाठी आणखी काही जागांचे पर्याय तपासले जात आहेत. जो पर्याय चांगला असेल तो निवडला जाईल. बीकेसीमधील जागेची पाहणी सुरू आहे'

    मुंबई, 23 डिसेंबर : मुंबईतील कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरून (kanjurmarg metro car shed) महाविकास आघाडी सरकार (MVA Goverment) आणि भाजपमध्ये (BJP) यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. तर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांच्याकडे या वादावर तोडगा काढण्यासाठी मागणी केली आहे. न्यूज18 लोकमतशी बोलत असताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो कारशेडच्या मुद्यावर  आपली भूमिका स्पष्ट केली आहे.   'कांजूर मार्ग ची जागा राज्य सरकारची आहे हे कागदोपत्री सिद्ध झाले आहे.  लाखो लोकांच्या हिताचा प्रकल्प आहे. कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेडचा निर्णय हा जनतेच्या हिताचा आहे. यामध्ये 1 कोटीहून जास्त लोकांना फायदा झाला असता. केंद्र सरकारनेही सहाकार्य करायला पाहिजे. सध्या प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. त्यामुळे अधीक बोलता येणार नाही' असं शिंदे म्हणाले. तसंच, ' राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नेहमीच महाविकास आघाडीला मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे या ही प्रकरणात ते लक्ष घालतील. शरद पवार ज्या ज्या वेळी असे प्रसंग येतात तेव्हा मार्गदर्शन करतात. पवार साहेबांनी पुढाकर घेतला तर यातून मार्ग निघू शकतो' असंही शिंदे म्हणाले,. 'कांजूरमार्ग येथील जागेवरून वाद सुरू आहे. न्यायालयाने फक्त कामाला स्थगिती दिली आहे. पण आणखी काही जागांचे पर्याय तपासले जात आहेत. जो पर्याय चांगला असेल तो निवडला जाईल. बीकेसीमधील जागेची पाहणी सुरू आहे', असंही शिंदे म्हणाले. ग्रामपंचायत निवडणुका स्थानिक पातळीवर पॅनल करुन लढवल्या जातात. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीतसुद्धा महाविकास आघाडीच आघाडीवर असेल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडवर तोडगा काढण्यासाठी विरोधकांना चर्चेसाठी आवाहन केले आहे. तर शरद पवार हे मेट्रोचा अहवाल वाचतील आणि योग्य तो निर्णय घेतील, असा पलटवार भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनीही मेट्रोच्या वादावर तोडगा काढण्यासाठी शरद पवारांच्या कोर्टात चेंडू टोलावला आहे. आता या वादावर कसा तोडगा निघतो हे पाहण्याचे ठरणार आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या