News18 Lokmat

शरद पवार लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणतात...

News18 Lokmat | Updated On: Oct 6, 2018 02:42 PM IST

शरद पवार लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणतात...

मुंबई, 06 आॅक्टोबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय कायम ठेवलाय. आज राष्ट्रवादीची मुंबई बैठक पार पडली या बैठकीत शरद पवारांनी महाराष्ट्रात कुठेही निवडणूक न लढवण्याचं म्हटल्याचं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टि्वट करून स्पष्ट केलं.

आगामी लोकसभा मतदार संघ निहाय पदाधिकारी यांच्याशी दोन दिवस राष्ट्रवादीची शनिवारी आणि रविवार असे दोन दिवस मुंबईत एनसीपी मुख्य कार्यालयात पार्टी अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित मतदारसंघातील पदाधिकारी यांच्याशी बैठक आयोजित करण्यात आलीये.

शरद पवार यांनी मागील सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी कोणतीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यावेळी शरद पवार निवडणूक लढवणार अशी अचानक चर्चा रंगली. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यास नकार दिला.

शरद पवार हे निवडणूक लढवणार हे कुणी कुणाला सांगितले याबद्दल माहिती नाही. पण पवार हे महाराष्ट्रात कुठूनही निवडणूक लढवणार नाही असं त्यांनीच जाहीर केलंय असं आव्हाड यांनी सांगितलं.

दरम्यान, या बैठकीत अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याच्या लोकसभा उमेदवारीवर शरद पवारांनी नकार दिल्याचं कळतंय.  जर घराण्यातल्या सर्वांनी निवडणूक लढवली तर कार्यकर्ते काय करणार? असा सवालच शरद पवारांनी केला. त्यामुळे पार्थ पवार यांच्या राजकीय एंट्रीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading...

तर दुसरीकडे नाशिक येथे छगन भुजबळ याचे पुतणे समीर यांचा विचार होणार का तसंच रायगड येथून सुनिल तटकरे यांना उमेदवारी देण्याच्या विचार असल्याचं समजतंय.

या बैठकीत मावळ, शिरूर, बारामती, कोल्हापूर, हातकणगंले, बीड, जळगांव रावेर यासह पुणे शहर लोकसभा मतदार संघातील लोकांशी चर्चा केली जात आहे. वास्तविक पुणे मतदार संघ हा काँग्रेसकडे असताना राष्ट्रवादी मात्र पुणे शहरातील लोकांशी चर्चा करणार असल्याने सर्वांच्या भुवया उंचविल्या आहे. एकाबाजूला आघाडी मित्र पक्ष काँग्रेस पक्षा सोबत जागा वाटपाची चर्चा सुरू त्याचवेळी  शरद पवार यांच्या उपस्थित पुणे शहर लोकसभा पदाधिकारी याच्याशी चर्चा करणार असल्याने राष्ट्रवादी हे काँग्रेस पक्षावर दबाव टाकत आहे का याची चर्चा सुरू झाली.

=============================================

गडकरी म्हणतात, 'पवारसाहेब कधी काय बोलतील आणि काय करतील याचा नेम नाही'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 6, 2018 02:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...