उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणं ही माझी चूकच; शरद पवारांची कबुली

'असे उमेदवार जाहीर करणं हे काम पक्षाच्या राज्याध्यक्षांचं आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे आणि आग्रहामुळे मी ती नावं जाहीर केली.'

News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2019 06:04 PM IST

उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणं ही माझी चूकच; शरद पवारांची कबुली

मुंबई 19 सप्टेंबर :  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी बीडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्ह्यातल्या 5 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यात धनंजय मुंडे यांच्यासह काही महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश होता. मात्र अशी यादी जाहीर करणं ही माझी चूकच होती अशी प्रांजळ कबुली शरद पवारांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिलीय. असे उमेदवार जाहीर करणं हे काम पक्षाच्या राज्याध्यक्षांचं आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे आणि आग्रहामुळे मी ती नावं जाहीर केली असंही त्यांनी सांगितलं. बीडमध्ये आज शरद पवार यांनी मोठी घोषणा करत राष्ट्रवादीच्या 5 उमेदवारांची नावंही जाहीर केली होती.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. मात्र आता या जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. त्यामुळे बीडमध्ये शरद पवार यांनी तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. तसंच परळीमध्ये पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

वाचा - यवतमाळ जिल्ह्यात 22 शेतकऱ्यांचा जीव घेणाऱ्या या 5 किटकनाशकांवर बंदी

कोणत्या मतदारसंघातून राष्ट्रवादीने कुणाला दिली उमेदवारी?

परळी - धनंजय मुंडे

Loading...

बीड- संदीप क्षीरसागर

माजलगाव - प्रकाश सोळके

गेवराई - विजयसिंह पंडित

केज - नमिता मुंदडा

शरद पवार यांनी निवडणुकीची घोषणा होण्याआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवारांची घोषणा केल्याने जिल्ह्यातील राजकारण मोठे चुरशीचे होणार आहे. राष्ट्रवादीच्या या खेळीला आता भाजप कसे उत्तर देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग झालं आहे. ही  शरद पवार हे सध्या राज्याच्या दौरा करत आहेत. या दौऱ्यावेळीच पवार यांनी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांबद्दल भाष्य केलं आहे.

वाचा - 'महाराष्ट्रासह देशभरात NRC कायदा लागू करा' - योगी आदित्यनाथ

'तुम्ही ताकद देऊन मोठे केलेले नेते आता पक्ष सोडून जात आहेत. याचा तुम्हाला त्रास होतो का?' असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, 'या नेत्यांनी पक्ष सोडल्याने मला अजितबात त्रास होत नाही किंवा वाईट वाटत नाही. उलट पक्ष सोडताना या नेत्यांनी दिलेल्या कारणांवर मला हसू येतं.'

'लोकांकडून मिळते उर्जा'

एकीकडे दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडला असताना शरद पवार यांनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे. 'मी जर घरात असेल तर मला अस्वस्थ व्हायला होतं. पण लोकांना भेटल्यावर मला बरं वाटतं. त्यांच्याकडून मला मोठी उर्जा मिळते,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 06:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...