Home /News /mumbai /

मावळ घटनेवरुन टीका करणाऱ्या Devendra Fadnavis यांना Sharad Pawar यांचे उत्तर

मावळ घटनेवरुन टीका करणाऱ्या Devendra Fadnavis यांना Sharad Pawar यांचे उत्तर

मावळ घटनेवरुन टीका करणाऱ्या Devendra Fadnavis यांना Sharad Pawar यांचे उत्तर

मावळ घटनेवरुन टीका करणाऱ्या Devendra Fadnavis यांना Sharad Pawar यांचे उत्तर

Sharad Pawar replies Devendra Fadnavis who criticise over Maval incident: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाराष्ट्र बंदची हाक दिल्यावर भाजपने मावळच्या घटनेचा उल्लेख करत टीका केली होती.

    मुंबई, 13 ऑक्टोबर : उत्तरप्रदेशातील लखीमपूर (Lakhimpur) येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या तिन्ही पक्षांनी 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद (Maharashtra Band) पुकारला होता. या बंदवरुन भाजपने मावळ येथील शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराच्या (Maval incident) घटनेचा दाखला देत जोरदार टीका केली होती. या टीकेवरुन शरद पवार (Sharad Pawar) यांनी आता जोरदार पलटवार केला आहे. ...म्हणून मावळमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकला शरद पवार म्हणाले, मावळमध्ये जे घडलं त्याला राजकीय नेते जबाबदार नव्हते. मावळमधील घटनेमध्ये पोलिसांवर आरोप होता. मावळमध्ये स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथावलं. मावळच्या लोकांना भडकवायला कुणी प्रयत्न केले हे लक्षात आल्यावर आता मावळमधील नागरिकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 90 हजार मतांनी विजयी केलं. मावळच्या जनतेला भाजपची भूमिका कळल्यामुळेच तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकला असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. शरद पवारांनी पुढे म्हटलं, लखीमपूरमध्ये शांतपणे रस्त्यावर चाललेल्या लोकांना चिरडले गेले. नागरिकांच्या अंगावर गाडी घालणं असा प्रकार आतापर्यंत कधी झाला नव्हता. लखीमपूरमध्ये जे घडलं ते आतापर्यंत कधी घडलं नव्हतं. केंद्रीय मंत्र्यांचे चिरंजीव गाडीत होते, सुप्रीम कोर्टाच्या प्रतिक्रियेनंतर मंत्र्यांच्या मुलांना अटक करण्यात आलं. लखीमपूरच्या प्रकारात शेतकऱ्यांच्या हत्येनंतर सत्ताधारी पक्षाने भूमिका घेणं अपेक्षित होतं. बघ्याची भूमिका घेत, कारवाई न करण या सर्वाला जबाबदार उत्तरप्रदेश सरकार आहे. लखीमपूर घटनेवर उत्तरप्रदेश सरकारचं अद्याप मौन आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन फडणवीसांना चिमटा ज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या "आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय" या वक्तव्यावर शरद पवारांनी भाष्य करत फडणवीसांना चिमटा काढला आहे. शरद पवार म्हणाले, काही आरोप झाल्यावर त्याचं स्पष्टीकरण भाजप द्यायला येतं, याचं महाल नवल वाटतं. ईडी, आयटी, एनसीबी सर्वांचाच गैरवापर होतोय. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, या केंद्रीय तपास यंत्रणांचा मला अभिमान आहे. कालच्या भाषणात ते म्हणाले की मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत आहे. मी चार वेळा मुख्यमंत्री होतो पण ते लक्षात राहत नाही. त्यांना मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं मी त्यांचं अभिनंदन करतो असं म्हणत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना चिमटा काढला आहे. शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्यावर हल्ला झाला, 5 जवान शहीद झाले चीनसोबत 13 वेळा बैठक घेण्यात आल्या पण एकही बैठक यशस्वी झाली नाही सीमाप्रश्नी राजकारण न करता सर्वपक्षीयांनी भूमिका घेणं गरजेचं आहे केंद्र सरकार यंत्रणेंचा गैरवापर करत आहे केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातोय सीबीआय, ईडी, एनसीबी सारख्या तपासयंत्रणांचा वापर राजकीयदृष्टीने होत असल्याचं दिसतंय अनिल देशमुखांच्या विरोधात तत्कालीन मुंबई पोलीस कमिश्नर यांनी काही आरोप केले, त्यावर अनिल देशमुखांनी राजीनामा दिला अनिल देशमुख यांच्यावर ज्यांनी आरोप केले त्यांचा आज पत्ता नाही अनिल देशमुख हे तातडीने बाजूला झाले आणि हे अधिकारी गायब झाले अनिल देशमुख यांच्या घरी 5 वेळा छापा टाकला 5-5 वेळेला एखाद्याच्या घरी छापा टाकण कितपत योग्य आहे याबाबत जनमत व्यक्त होणं गरजेचं आहे 5-5 वेळा छापा टाकून काय मिळालं अनिल देशमुखांवर आरोप करणारे आज कुठे आहेत? शरद वापारांचा सवाल लखीमपूरमध्ये शांतपणे रस्त्यावर चाललेल्या लोकांना चिरडले नागरिकांच्या अंगावर गाडी घालणं असा प्रकार आतापर्यंत कधी झाला नाही लखीमपूरमध्ये जे घडलं ते आतापर्यंत कधी घडलं नव्हतं केंद्रीय मंत्र्यांचे चिरंजीव गाडीत होते सुप्रीम कोर्टाच्या प्रतिक्रियेनंतर मंत्र्यांच्या मुलांना अटक करण्यात आलं लखीमपूरच्या प्रकारात शेतकऱ्यांच्या हत्येनंतर सत्ताधारी पक्षाने भूमिका घेणं अपेक्षित होतं बघ्याची भूमिका घेत, कारवाई न करणं या सर्वाला जबाबदार उत्तरप्रदेश सरकार आहे लखीमपूर घटनेवर उत्तरप्रदेश सरकारचं अद्याप मौन मावळमध्ये जे घडलं त्याला राजकीय नेते जबाबदार नव्हते मावळमधील घटनेमध्ये पोलिसांवर आरोप होता मावळ घटनेवरुन टीका करणाऱ्या फडणवीसांना शरद पवारांचे उत्तर मावळमध्ये स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथावलं मावळच्या लोकांना भडकवायला कुणी प्रयत्न केले हे लक्षात आल्यावर आता मावळमधील नागरिकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 90 हजार मतांनी विजयी केलं मावळच्या जनतेला भाजपची भूमिका कळल्यामुळेच तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकला काही लोकांना आणि पक्षांना बदनाम करण्याची जबाबदारी घेतली केंद्रीय यंत्रणांपेक्षा मुंबई पोलीस जास्त कार्यक्षम आहेत केंद्रीय यंत्रणांपेक्षा मुंबई पोलिसांनी जास्त ड्रग्ज जप्त केलं कुणी शंका घेऊ नये अशी कारवाई मुंबई पोलीस करतात कुठंही गुन्हा घडला तर पंचनामा करतात, पंचांच्या साह्या घेतल्या जातात, ती कारवाई योग्य आहे याची खातरजमा होण्यासाठी पंचांच्या साक्षीने केलं जातं हे कोण गोसावी होते, ते त्यांच्या character वरून integrity लक्षात येते. या अधिकाऱ्यांचं असोसिएशन कशा प्रकारच्या लोकांबरोबर आहे हे लक्षात येतं
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Sharad pawar

    पुढील बातम्या