शरद पवारांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, महिला आयोगाच्या भूमिकेवर घेतली शंका

शरद पवारांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, महिला आयोगाच्या भूमिकेवर घेतली शंका

धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांचा उल्लेख बहिणाबाई असा केलाय...

  • Share this:

मुंबई,21 ऑक्टोबर: राष्ट्रवादीचे परळीचे (जि.बीड) उमेदवार धनंजय मुंडे यांनी भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडेंबाबत केलेल्या कथित वक्तव्याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महिला आयोगाने धनंजय मुंडेंवर ज्या पद्धतीने कारवाईचे संकेत दिले, त्यावर शरद पवार यांनी शंका उपस्थित केली आहे.

धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांचा उल्लेख बहिणाबाई असा केला. या शब्दामध्ये काही चुकीचे नाही, असे सांगत पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. धनंजय मुंडेंच्या या भाषणाची क्लीप व्हायरल झाल्यानंतर लगेचच याची नोंद घेऊन महिला आयोगाने धनंजय मुंडेंवर कारवाईचे संकेत दिले आहेत.

महिला आयोगाचा हा 'पक्षपातीपणा'

महिला आयोग हा कुठल्याही पक्षाचा नाही ही स्वतंत्र यंत्रणा आहे. मात्र, या आयोगाच्या अध्यक्षपदी भाजपचा माणूस बसल्याने ते 'पक्षपातीपणा' करत असल्याचा आरोप पवारांनी केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्हायरल झालेली क्लीप आधी महिला आयोगाने काळजीपूर्वक तपासून योग्य पाऊल उचलण्याची गरज होती, मात्र तसे झालेले दिसत नसल्याचे मत पवारांनी व्यक्त केले आहे.

पंकजा मुंडे खालच्या पातळीचे राजकारण करू नका...

धनंजय मुंडे यांना महिला आयोगाने नोटीस बजावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पंकजा मुंडेसह राज्य महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांच्यावर टीका केली आहे. पंकजा मुंडे खालच्या पातळीचे राजकारण करू नका, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. 'विजया रहाटकर मॅडम राज्यात 32 हजार बलात्काराच्या केसेस झाल्या. औरंगाबाद, पंढरपूर येथे सामूहिक बलात्काराच्या घटना घडल्या तेव्हा तत्परता दाखवली नाही', असा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे.

बाबा, ALL THE BEST! धनंजय मुंडेंच्या गोंडस मुलीचा VIDEO एकदा पाहाच

Published by: Sandip Parolekar
First published: October 21, 2019, 1:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading