नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही, शरद पवारांनी उपटले पार्थचे कान

नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही, शरद पवारांनी उपटले पार्थचे कान

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्याच्या या मागणीवर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 ऑगस्ट :  अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. आपल्या नातावाने केलेल्या या मागणीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

'माझ्या नातवाच्या मागणीला मी कवडीची किंमत देत नाही, तो अपरिपक्वव आहे' अशा शब्दांत शरद पवार यांनी पार्थ पवार यांची चांगलीच कानउघडणी केली आहे.

तसंच 'सुशांत प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे देण्याची कोणतीही गरज नाही. मुंबई पोलिसांना मी गेल्या 50  वर्षांपासून ओळखतो. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.

सुशांतच्या वडिलांबद्दल केलेल्या दाव्यावर संजय राऊतांचे मोठे विधान, म्हणाले...

'सुशांतसिंग प्रकरणाची चर्चा करण्याचे कारण नाही. त्यामुळं कुणी काय आरोप केले यात मी खोलात जाणार नाही. माझ्या दृष्टीनं हा विषय तितका महत्वाचा नाही. एखाद्याने आत्महत्या केली तर नक्कीच दु:ख होते. परंतु, त्याची चर्चा ज्या पद्धतीने होत आहे. त्याचे मला आश्चर्य वाटते.' असंही पवार म्हणाले.

त्याचबरोबर, 'सातारा जिल्ह्यात एका शेतकऱ्यांने मला विचारलेही याबद्दल. त्यालाही याबद्दल आश्चर्य वाटते. २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी त्याची नोंद घेतली जात नाही' असंही पवार म्हणाले.

युरोपमध्ये ते चित्र पाहून सुशांतची मानसिक स्थिती बिघडू लागली,रियाचा ED समोर दावा

काही दिवसांपूर्वी  पार्थ पवार (Parth Pawar) यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची भेट घेतली होती. यावेळी पार्थ पवार यांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली.

विशेष म्हणजे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच याप्रकरणी सीबीआय चौकशीची आवश्यकता नसल्याचं म्हटलं होतं. अशातच पार्थ पवार यांनी मात्र सीबीआय चौकशीची मागणी केली. त्यामुळे राष्ट्रवादीतच या विषयावरून वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे समोर आले होते.

Published by: sachin Salve
First published: August 12, 2020, 2:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading