नाणार प्रकल्प महाराष्ट्रातून जाऊ नये पण...-शरद पवार

नाणार प्रकल्प महाराष्ट्रातून जाऊ नये पण...-शरद पवार

नाणार प्रकल्प हा केंद्र सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून जावा असं वाटत नाही. पण...

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : नाणार प्रकल्प जावा असं वाटत नाही. मात्र प्रकल्पाची जागा बदलता येते का यासाठी पर्यायी जागेचा विचार होऊ शकतो असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय.

नाणार प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजपमध्ये खडाजंगी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या वादात उडी घेतली. नाणार प्रकल्प हा केंद्र सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून जावा असं वाटत नाही. पण स्थानिकांचा विरोध पाहता प्रकल्पाची जागा बदलता येते का यासाठी पर्यायी जागेचा विचार होऊ शकतो. प्रत्यक्ष जागेवर गेल्यानंतरच मी माझं मत व्यक्त करेल असं पवारांनी म्हंटलंय.

कठुआ प्रकरणात सरकारने लक्ष्य घातलं पाहिजे -पवार

शरद पवार यांनी कठुआ बलात्कार प्रकरणावरही तीव्र नाराजी व्यक्त केली. जम्मू-काश्मीरमध्ये जे झालं तो अस्वस्थ परिसर आहे. एवढं गंभीर प्रकरण झालं, हे प्रकरण बाहेर आलं, याकडे केंद्र सरकारने गंभीर लक्ष्य घातले पाहिजे असं पवार म्हणाले.

आज त्या मुलीच्या कुटुंबियांना, वकिलांना संरक्षण दिलं पाहिजे, राज्यकर्त्यांची बघ्याची भूमिका दिसते, या लोकांच्या जीवाला धोका नाकारता येत नाही अशी भीतीही पवारांनी व्यक्त केली.

'उन्नाव प्रकरणी योगी सरकार कारवाई करत नाही'

तसंच उत्तरप्रदेशमधील उन्नाव प्रकरणावरही शरद पवारांनी योगी सरकारला खडेबोल सुनावले.  उत्तरप्रदेशचं चित्र ऐकायला मिळते ते भयावह आहे. कुटुंब प्रमुखाने आत्महत्या केली, ते हयात नाही, जे घडलं ते दुर्दैवी आहे. ज्यांच्यावर आरोप आहे ती व्यक्ती लोकप्रतिनिधी आहे. सत्तेत सहभागी आहे त्यामुळे कारवाई होत नाही  अशी टीका पवारांनी केली.

केंद्र सरकारमध्ये ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी या प्रकरणांवर प्रतिक्रिया देणं अपेक्षित आहे असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता टीका केली.

First published: April 13, 2018, 5:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading