आंबेडकर स्मारकाचं काम 2 वर्षात पूर्ण व्हायला हवं - शरद पवार

आंबेडकर स्मारकाचं काम 2 वर्षात पूर्ण व्हायला हवं - शरद पवार

'न्यूयॉर्कला गेल्यावर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला पाहण्यासाठी जसे आवर्जून लोक जातात तसं मुंबईत डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी लोक येतील.'

  • Share this:

मुंबई, 21 जानेवारी : न्यूयॉर्कला गेल्यावर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला पाहण्यासाठी जसे आवर्जून लोक जातात तसं मुंबईत डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी लोक येतील. येत्या दोन वर्षात इंदू मिल इथल्या डॉ. आंबेडकर स्मारकाचं काम पूर्ण व्हायला हवं, असं मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं.

बहुचर्चित इंदू मिल इथल्या जागेची पाहणी करण्यासाठी पवार दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी तिथेच पत्रकारांशी बातचित केली. आंबेडकर स्मारकाचं काम दोन वर्षा पूर्ण होणं शक्य आहे, असं पवार म्हणाले. याहून अधिक उशीर यासाठी नको, असंही ते म्हणाले. गर्दीच्या काळात स्मारकाची विशेष काळजी घ्यावी लागेल, असं त्यांनी सांगितलं.

मुंबईच्या इंदू मिल इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. त्याचं 25 टक्के काम पूर्ण झालं आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही 2020 पर्यंत स्मारक पूर्ण करण्याची घोषणा पंधरा दिवसांपूर्वीच केली होती. 'महाविकास आघाडी सरकारकडून 2022 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं इंदू मिल येथील स्मारक पूर्ण केलं जाईल,' अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली  होती. 'मुंबईत आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला पाहावसं वाटेल असं भव्य दिव्य स्मारक उभा करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे,' अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

या स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2015 साली झालं होतं. "स्मारकाबाबत बऱ्याच परवानग्या मिळाल्या आहेत. काही परवानग्या बाकी आहेत. त्या राज्य सरकारच्या अख्यातरीत आहेत म्हणून काही अडचणी येणार नाहीत", असंही स्मारक परिसराला भेट दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले होते.

First Published: Jan 21, 2020 05:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading