भाजपला दुसरा धक्का देण्यासाठी शरद पवारांचा 'असा' आहे प्लॅन!

भाजपला दुसरा धक्का देण्यासाठी शरद पवारांचा 'असा' आहे प्लॅन!

राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

  • Share this:

मुंबई, 19 डिसेंबर : राज्यातील सत्तासंघर्षात अनेक नाट्यमय आणि ऐतिहासिक घडामोडी घडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. आता नागपूर हिवाळी अधिवेशनही गदारोळात चांगलेच गाजत आहे. राज्यात सर्वाधिक जागा मिळवलेल्या भाजपला बाहेर ठेवण्यात निकालानंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडीला यश आलं. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं एकत्र येऊन आघाडी केली आणि राज्यात सरकार स्थापन केलं. या महाविकास आघाडीच्या पॅटर्नची चर्चा सर्वत्र सुरु झाली. त्यानंतर राज्यात इतरत्र हा पॅटर्न राबवण्याच्या तयारीत महाविकास आघाडी आहे. याबाबतचे संकेत या महाविकास आघाडीला एकत्र बांधून ठेवणाऱ्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच दिले आहेत. महाविकास आघाडीचे राजकारण आता महापालिकेत दिसण्याची शक्यता आहे.

भाजपला सत्ता स्थापनेपासून दूर रोखत विरोधी बाकावर बसावे लागत आहे. भाजपला रोखणाऱ्या महाविकास आघाडीचा हा पॅटर्न आता मुंबई महापालिकेत दिसण्याची शक्यता आहे. हा महाविकास आघाडीचा पुन्हा राबवण्यासाठी काम सुरू असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.

विधानसभा निवडणुक, निकाल आणि त्यानंतर सत्तास्थापनेच्या धामधुमीची अखेर महाविकास आघाडीसाठी गोड ठरली. आता आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका सुरु होणार आहेत. त्यातही महाविकास आघाडीचा पॅटर्न दिसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 2022 ला मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. तेव्हा तीनही पक्ष एकत्र असतील असं सूतोवाच शरद पवार यांनी केलं होतं. त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजपला धक्का देण्यासाठी पवारांची तयारी सुरु झाली असल्याचं म्हटलं जात आहे.

भाजपकडून मुंबई महापालिकेत आमचीच सत्ता येईल असा दावा याआधी करण्यात आला होता. त्यासाठी आशिष शेलार यांच्याकडे सर्व सूत्रे देण्यात आल्याची चर्चा आहे. तसंच भाजप नेत्यांकडूनही मुंबई महापालिकेसाठी हालचाली सुरु झाल्याचंही सांगितलं जात आहे.

मुंबई महापालिकेत शिवसेनेला भाजपची मोठी टक्कर असणार आहे. याठिकाणी राष्ट्रवादीला अद्याप म्हणावे तितके यश मिळालेले नाही तर काँग्रेसची अवस्थाही फारशी चांगली नाही. शिवसेनेसाठी महापालिकेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. सध्या शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेत किशोरी पेडणेकर यांची निवड झाली आहे.

SPECIAL REPORT : संघाच्या बौद्धिक बैठकीला जाऊन कसं वाटलं? विखे पाटील म्हणाले...

Published by: Manoj Khandekar
First published: December 19, 2019, 10:52 AM IST
Tags: shivsena

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading