VIDEO : Lockdown Drive, शरद पवारांची सुप्रियांबरोबर Mumbai सफर; टिळक भवनातील आठवणींना उजाळा

VIDEO : Lockdown Drive, शरद पवारांची सुप्रियांबरोबर Mumbai सफर; टिळक भवनातील आठवणींना उजाळा

Sharad Pawar Supriya Sule Mumbai tour सुप्रिया सुळे यांनी चेंज म्हणून शरद पवारांबरोबर फेरफटका मारायण्यासाटी रितसर परवानगी घेऊन जात असल्याच फेसबूक लाईव्हमध्ये सांगितलं. यावेळी पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

  • Share this:

मुंबई, 07 मे : संपूर्ण राज्यात लॉकडाऊन (Lockdown) असताना शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शुक्रवारी सायंकाळी मुंबईत गाडीतून फेरफटका (Drive in Mumbai) मारला. थोडा वेळ चेंज म्हणून मुंबईत ड्राईव्हला आल्याचं सुप्रिया सुळे यांनी फेसबूक लाईव्हमध्ये (Supriya Sule Facebook Live) सांगितलं. तर शरद पवारांशी बोलताना त्यांनी जुन्या आठवणी ताज्या केल्या. शरद पवारांनीही टिळक भवनात (Tilak Bhavan) राहत असतानाच्या आठवणींनी उजाळा दिला.

शरद पवार हे प्रकृती अस्वास्थ्यामुळं गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत होते. त्यामुळं ते पूर्णपणे घरी होते. केवळ रुग्णालय ते घर असे शरद पवार मधल्या काळात बाहेर पडले. पण रुग्णालयातून घरी आल्यानंतर बरं वाटायला लागताच शरद पवारांनी कामाला सुरुवात केली. शुक्रवारी त्यांनी राज्य सरकारला एक पत्र लिहित काही मागण्या केल्या. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्याबरोबर शरद पवारांनी गाडीतून मुंबईत फेरफटका मारला. चेंज म्हणून मुंबईत ड्राईव्हला निघाल्याचं सुळे यांनी यावेळी म्हटलं. तसंच रितसर परवानगी घेऊन जात असल्याचंही त्यांनी आवर्जुन नमूद केलं.

(वाचा-शरद पवारांनी CM ना लिहिले पत्र, सूचना करत असताना सुप्रिया सुळेंचे Facebook Live)

यावेळी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी जुन्या आठवणी ताज्या केल्या. मुंबईत आल्यापासून ते आतापर्यंत मुंबई किती बदलली याविषयी या बाप-लेकीमध्ये यावेळी चर्चा झाली. 1971 मध्ये सुप्रिया सुळे यांनी आपण मुंबईत आल्याचं शरद पवारांना म्हटलं. पण शरद पवार यांनी मी त्यापूर्वीच मुंबईत आलो होतो, असं म्हटलं. तेव्हा सुप्रिया यांनी मी आणि आई 1971 मध्ये आलो होतो असं सांगितलं. त्यानंतर शरद पवारांनी आणखी काही जुन्या आठवणींवर सुप्रिया यांच्याबरोबर चर्चा केली.

शरद पवारांनी यादरम्यान सुप्रिया सुळे यांना टिळक भवनात राहिल्याच्या आठवणीही सांगितल्या. शरद पवार यांनी सांगितलं की, ते पाच वर्षे टिळक भवनमध्ये राहिले होते. त्यावेळी कार्यकर्ते टिळक भवनात येऊन राहायचे आणि कामं करायचे. त्यावेळी कार्यकर्त्यांबरोबरचे अनुभव कोकणी उत्सव कसे साजरे व्हायचे अशा अनेक आठवणींना शरद पवार यांनी यावेळी उजाळा दिल्याचं पाहायला मिळालं.

(वाचा-Lockdownवरुन मनसेचा गोंधळ; अधिकाऱ्याच्या अंगावर मनसे कार्यक्रर्ते गेले धावून)

अनेक दिवसांनंतर शरद पवार घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी अशाप्रकारे मुंबईत फेरफटका मारला. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळं कुठंही गर्दी नसताना त्यांना ते शक्यही झालं. सुप्रिया सुळे यांनीही अनेकदिवसांनंतर फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना शरद पवारांची भेट घडवली.

Published by: News18 Desk
First published: May 7, 2021, 8:26 PM IST

ताज्या बातम्या