मुख्यमंत्री आणि शरद पवारांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक, राजकीय चर्चांना उधाण

मुख्यमंत्री आणि शरद पवारांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक, राजकीय चर्चांना उधाण

  • Share this:

24 मे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी  काँग्रेसचे शरद पवार यांच्यात काल सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. त्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास 15 मिनिटं चर्चा झाली असून या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्दयांवर चर्चा झाली हे अजून गुलदस्त्यात आहे.

शरद पवारांची भेट पुर्वनियोजीत होती का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र त्यांच्या या अचानक भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती.त्यानंतर महाराष्ट्रातील सहकारी बँकांचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं.कारण नोटबंदीच्या निर्णयानंतर सर्वात जास्त फटका सहकारी बँकांना बसला होता. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट असण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे,  मुख्यमंत्री कार्यालयानं कॅगच्या अहवालानंतर लवासाचा विशेष नियोजन प्राधिकरण दर्जा रद्द केला असल्याने भेट घेण्यामागे हे एक कारण असू शकतं असं बोललं जात आहे.

First published: May 24, 2017, 10:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading