Home /News /mumbai /

आमदारांना मुंबईत 300 घरे देण्याच्या निर्णयावर शरद पवारांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

आमदारांना मुंबईत 300 घरे देण्याच्या निर्णयावर शरद पवारांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

फाईल फोटो

फाईल फोटो

Sharad Pawar made a big statement on decision of thackeray government to give 300 houses to mla in mumbai: महाराष्ट्रातील आमदारांना मुंबईत 300 घरे देण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

पुढे वाचा ...
    विनोद राठोड, प्रतिनिधी मुंबई, 28 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी मुंबईमध्ये राहण्यासाठी आमदारांना घर (MHADA houses to MLAs in Mumbai) देण्यास विरोध केला आहे. महाविकासआघाडी सरकारच्या निर्णयाला शरद पवार यांनी विरोध केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या घोषणेनंतर, विरोधी पक्षापासून सामान्य जनतेने या निर्णयाचा विरोध केला आहे. त्यानंतर आता शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा निर्णय चुकीचा असल्याने त्याला विरोध दर्शवला असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील सर्वपक्षीय आमदारांसाठी म्हाडाची 300 घरे देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर याचे पडसाद आता सोशल मीडियावर उमटताना पाहायला मिळत असून महाराष्ट्र सरकारला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. तर कोट्यवधींची मालमत्ता असणाऱ्या आणि लाखोंचा पगार असणाऱ्या आमदारांना मोफत घर कशासाठी? असा सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. वाचा : गिरीश बापट यांचा भाजपला घरचा आहेर, आमदारांना घर देण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाचं केलं स्वागत राज्यात कोरोना काळात सर्वसामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे सांगत आमदारांना मुंबईमध्ये राहण्यास घर देण्याची गरज नाही असे पवारांनी स्पष्ट केले. राज्याच्या विकाससाठी सरकारने पैसे खर्च करावा असा सल्ला ही शरद पवार यांनी दिला असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे आमदारांना मोफत घरे दिली जाणार नसून त्यांची किंमत आमदारांकडून आकारली जाणार आहे, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे. आता खुद्द राज्य सरकारमधील आमदार आणि मंत्र्यांनीच आपल्याला अशी मोफत घरे नकोत, असे उघडपणे सांगितल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मुंबईबाहेरील आमदारांना मुंबईत घरे मिळत नसल्याने आणि त्यांना भाडेही परवडत नसल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे. 'आमदार फुटू नये म्हणून घरांची घोषणा' 300 आमदारांना घरं बांधून देणार अशी घोषणा ठाकरे सरकारने केली. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, 'आमदार पळून जातील आणि सरकार पडेल म्हणून हा निर्णय घेतला आहे'. 'आमदारांना कशाला घर कशाला हवं आहे. कुणी आमदार व्हायला नारळ दिला नव्हता. मी म्हणतो घर कशाला हवे. या लोकाना रोज डिप्लोमेसी करावी लागत आहेत. मुळात महाविकास आघाडीचे आमदार फुटू नये म्हणून ही घोषणा केली आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Maharashtra News, Mumbai, Sharad Pawar (Politician), Uddhav thackeray

    पुढील बातम्या