शरद पवारांनी मुंडेंचं घर फोडलं नाही, राष्ट्रवादीचा पलटवार

शरद पवारांनी मुंडेंचं घर फोडलं नाही, राष्ट्रवादीचा पलटवार

'सरदार पटेल यांचा पुतळा दोन वर्षात सरकारने केला. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाची अजून फक्त चर्चाच होते. यावरून याचं छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं प्रेम कळतं'

  • Share this:

मुंबई 23 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रसला गळती लागल्यानंतर अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताहेत. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. पवारांनीच मुंडेंच घर फोडलं असा आरोप त्यांनी केला होता. अंतर्गत राजकारणासाठी पवारांनी ही कृती केल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळच मला पक्ष सोडावा लागला असा आरोपही त्यांनी केला होता. जयदत्त क्षीरसागर यांचा रोख हा धनंजय मुंडे यांच्यावर होता. क्षारसागर यांच्या या आरोपांना आता राष्ट्रवादीचे नेते जीतेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलंय. आव्हाड हे आता पवारांवर होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्यात आघाडीवर आहेत. आव्हाड म्हणाले, क्षीरसागर यांनी इतिहासाचा विपर्यास करू नये, पवार यांनी मुंडे यांच घर फोडले नाही, त्याचा साक्षीदार मी होतो.

बीडच्या राजकारणात मुद्दाम वेगळं वातावरण निर्माण करण्यासाठी जयदत्त क्षीरसागर बोलत आहेत. त्यांनी खालच्या पातळीचं राजकारण करू नये. आव्हाड पुढे म्हणाले, सरदार पटेल यांचा पुतळा दोन वर्षात सरकारने  केला. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाची अजून फक्त चर्चाच होते. यावरून याचं छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं प्रेम कळते असा टोलाही आव्हाड यांनी भाजपाला हाणला. भाजपाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने नवीन घोषणा केली. त्यावरही आव्हाड यांनी टीका केली.

मुख्यमंत्री म्हणाले, युतीचं लवकरच कळेल.. नारायण राणेंचा 'निर्णय' योग्य वेळी!

क्षीरसागर यांनी काय केला होता आरोप?

बीडमध्ये शरद पवारांनी जयदत्त क्षिरसागर यांच्यावर जहरी टीका केल्यानंतर आज जयदत्त क्षिरसागर यांनी टीकेला प्रत्युत्तर देत हल्ला चढवला आहे. 'पवारांनी दुसऱ्यांच्या घरात वितुष्ट आणून घरं फोडली. यात गोपीनाथ मुंडेंचं घर फोडून पुतण्याला बक्षीस दिलं. असं राज्यात अनेकांच्या बाबतीत घडलं आहे. पवारांनी दुसऱ्याला आदेश देण्यापेक्षा स्वत: आत्मपरीक्षण करावं' असा सल्ला जयदत्त क्षिरसागर यांनी पवारांना दिला आहे. ते बीडमधील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी बोलत होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, 'पक्षात असतानाच पवारांना विचारायचं होतं की 15 वर्षांत त्यांनी काय केलं. राष्ट्रवादीत माझी कोंडी केली होती. ते फोडण्याकरता मी सेनेत गेलो आहे. मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी जे काम या युती सरकारने केले ते काम आघाडी सरकारने केलं नाही.' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. दुर्दैवाने राष्ट्रवादीत मतभेद असायला पाहिजे होते मनभेद नाही. याकरणामुळे मोठ्या प्रमाणत लोक पक्ष सोडून चालले आहेत. याचं आत्मचिंतन पवारांनी करावं.' अशा शब्दात क्षिरसागर यांनी पवारांवर टीका केली आहे.

VIDEO: थोडी वाट बघा... मुख्यमंत्र्यांनी युतीच्या निर्णयाबाबत केलं आवाहन

'भाकरी फिरावयची तर दुसरीकडे फिरवा. जिथे फिरवायची तिथे फिरवत नाहीत नको तिथे फिरवत बसतात. त्यामुळे राष्ट्रवादीवर ही वेळ आली आहे. कॉँग्रेस राष्ट्रवादीची घसरगुंडी थांबवणं अवघड आहे. लोकांमधे मानसिकता झाली. कार्यकर्ते नैराश्याने ग्रासले आहेत. पक्षांतर करणारे चौकशी किंवा पदाच्या आशेने जात नाहीत. हे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या त्रासाला कंटाळून चालले आहेत. यामुळे काळ ठरवेल चूक काय आणि बरोबर काय' असा टोलाही जयदत्त क्षिरसागर यांनी लगावला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 23, 2019, 2:57 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading