• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • फडणवीसांना सरकार पाडण्याची घाई, पण.., मोदींचं कौतुक करत पवारांचा सणसणीत टोला

फडणवीसांना सरकार पाडण्याची घाई, पण.., मोदींचं कौतुक करत पवारांचा सणसणीत टोला

'पंतप्रधान मोदी यांना सर्व राज्यांना सोबत घेऊन काम करावे असं वाटत आहे. पण पण त्यांचे सहकारी त्यांना असं करू देत नाही'

 • Share this:
  मुंबई, 28 जुलै : 'ठाकरे सरकार पाडण्याचा आमचा इरादा नाही, पण हे सरकार अंतर्गतविरोधाने पडेल' असा दावा करणारे भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांगलेच फटकारुन काढले आहे. फडणवीस हे अस्वस्थ झाले आहे, असं म्हणत पवारांनी टोला लगावला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी न्यूज18 लोकमतला विशेष मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी भाजपवर एकच हल्लाबोल केला आहे. 'सत्तेतून पायउतार झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे कमालीचे अस्वस्थ झाले आहे. त्यांना सरकार पाडण्याची घाई झाली आहे. पण राज्यात सध्याची परिस्थिती पाहता कुणालाही निवडणुका नको आहे. राज्यात सध्या कोणताही पर्याय नाही. त्यामुळे हे सरकार 5 वर्ष टिकेल', असं म्हणत पवारांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. 'भाजपला लोकशाही विचार पचत नाही, असं दिसतं आहे. म्हणून आपल्या विचारापेक्षा दुसरं सरकार नकोच असं चालू आहे,  हे योग्य नाही. पंतप्रधान  मोदी यांना सर्व राज्यांना सोबत घेऊन काम करावे असं वाटत आहे. पण पण त्यांचे सहकारी त्यांना असं करू देत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे, अशी टीकाही पवारांनी केली आहे. EXCLUSIVE:उद्धव ठाकरेंबद्दल पवारांनी पहिल्यांदाच बोलून दाखवली नाराजी, म्हणाले... तसंच, महाविकास आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल माझ्या हातात नाही. आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. मागील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या एकांगी कारभारामुळे संधी जाणवली होती.  या परिस्थितीत आम्ही सर्व चाचपडून पाहिलं आणि याचे नेतृत्व शिवसेनेकडे जावं यासाठी एकमत झाले होते', असंही पवारांनी सांगितलं. तर गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'मातोश्री'वर बसून काम करत आहे. ते मंत्रालयात येत नाही, अशी टीका करत आहे. त्यांच्या टीकेचा धागा पकडून शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ज बिलांवरून मनसे गप्प राहील, असं समजू नका; राज यांचा उद्धव ठाकरेंना इशारा 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम चांगले आहे. त्यांनी एका ठिकाणी बसून परिस्थिती सांभाळावी यात कोणताही वाद नाही. पण थोडं फिरलंही पाहिजे' असं सांगत शरद पवारांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. 'राज्यातील धोरणात्मक निर्णय हे मुख्यमंत्री घेत असतात. प्रशासन घेत नाही. विशेषतः सर्व सहकाऱ्यांना मुख्यमंत्री विश्वासात घेऊन काम करत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सरकारला चिंता नाही. ते सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करत आहे', असं कौतुकही पवारांनी केले.
  Published by:sachin Salve
  First published: