मुंबई 30 ऑक्टोबर: वाढीव वीज बिल आणि इतर मुद्यांवर भेटायला गेलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांना शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटण्याचा सल्ला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांनी दिला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली होती. या चर्चेवरून शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज यांच्यावर निशाणा साधला आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांना प्रचंड प्रमाणात वीजेची बिलं आली होती. त्यावरून प्रचंड गदारोळही झाला होता. मात्र वीज बिलं काही कमी झाली नाहीत. त्यामुळेच राज ठाकरे यांनी राज्यपालांना भेटण्याचा निर्णय घेतला.
या प्रकरणावर बोलताना राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्यात अडचण वाटत असेल त्यामुळेच राज्यपालांनी त्यांना शरद पवारांकडे जाण्याचा सल्ला दिला असेल असं सत्तार म्हणाले. ‘शरद पवारांकडे हर मर्ज की दवा है’ असा टोली त्यांनी लगावला.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीत राज्यपालांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला. अखेर राज यांनी राज्यपालांचा सल्ला मान्य करत शरद पवारांशी फोनवर चर्चा केली आहे.
उर्मिला मातोंडकरचं नाव आमच्याकडं चर्चेत नाही, शिवसेना नेत्यानं टाकला पडदा
दूध उत्पादक शेतकरी आणि वाढीव वीज बिलाच्या मुद्यांवर आज राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी राज यांनी सर्वसामन्याच्या वीज बिलात झालेली वाढ कमी करण्यात यावी, याबद्दल चर्चा केली.
काय आहे राज ठाकरे यांच्या मागण्या?
'लॉकडाउनच्या काळात लोकांना भरमसाठ वीज बिल देण्यात आले आहे. याबद्दल आम्ही राज्य सरकारशी बोललो. आमच्या नेत्यांनी ऊर्जा मंत्र्यांची भेट सुद्धा घेतली. पण, त्यावर अजूनही कोणताही तोडगा निघाला नाही. सरकारने वीज ग्राहकांना गेल्या महिन्यांच्या वीजबिलातील वाढीव रक्कम परत करायला हवी, अशी पहिली मागणी राज ठाकरे यांनी केली.
पवारांप्रमाणे जो बायडन यांचा करिष्मा चालणार? पावसातील सभा पाहून साताऱ्याची आठवण
तसंच, 'दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरावरही राज ठाकरेंनी लक्ष्य वेधलं. आज दूध संकलन करणाऱ्या मोठ्या संस्था एका लिटरमागे शेतकऱ्याला 17 ते 18 रुपये देतात आणि त्यावर भरघोस नफा कमवत असतात. कधी सुका दुष्काळ तर कधी ओल्या दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त आहे. वाढत्या महागाईमुळे गुरांची देखभाल करणे महाग झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एका लिटरमागे 27 ते 28 रुपये मिळावे', अशी मागणीही राज यांनी केली.