Home /News /mumbai /

Sharad Pawar: घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Sharad Pawar: घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Sharad Pawar first reaction after ST employees protest outside his house silver oak: एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

    मुंबई, 8 एप्रिल : आज दुपारच्या सुमारास अचानक मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थाना बाहेर जमा झाले. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी दगडफेक आणि चप्पलफेक केली. (ST Employees protest outside Sharad Pawar residence) या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या आंदोलनानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले. त्यानंतर आता शरद पवार यांची प्रतिक्रिया आली आहे. शरद पवार म्हणाले, मी एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे, त्यांना आधार देणं गरजेचं आहे. पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाहीये. एसटी कर्मचाऱ्यांचा मार्ग चुकत असेल तर त्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. राजकारणात संघर्ष असतात पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाहीये. गेले काही दिवस हे जे काही आंदोलनाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न होत होता ते शोभनीय नव्हता. एसटी कर्मचारी आणि माझा घनिष्ठ संबंध आहे. गेल्या 50 वर्षांपासून हे नाते आहे. त्यांचं एकही अधिवेशन माझ्याकडून सुटलं नाही. संकट आलं तर आपण सर्व एकत्र आहोत हे तुम्ही दाखवून दिलं त्याबद्दल तुमचे आभार असंही शरद पवार कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले. टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. नेता चुकीचा असेल तर त्याचे परिणाम काय होतात हे आज दिसलं असंही शरद पवार म्हणाले. "एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागचा सूत्रधार शोधणार, दोषींवर कारवाई करणार" या आंदोलनानंतर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, अचानक आणि दुर्दैवी घडलेली घटना आहे. इतक्या जेष्ठ नेत्याच्या घरी अशा प्रकारे हल्ला करणं निश्चितच काळजी करण्याची गोष्ट आहे. यामध्ये इंटेलिजन्सचं फेल्युअर कुठे झालं याबाबत निश्चितच माहिती घेतली जाईल. याबाबत पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. एसटी कामगारांच्या आडून काही राजकीय शक्ती हिंसा घडविण्याचा काम करत आहे. महिलांना पुढे करून मॉब तयार करण्यात आला आहे, यामुळे पोलिसांना कारवाई करता आली नाही. खरेच आंदोलक होते का? याचा शोध करण्यात येणार आहे असंही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Sharad Pawar (Politician), St bus

    पुढील बातम्या