मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

देशभर गदारोळ झाल्यानंतर पालघरच्या घटनेवर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

देशभर गदारोळ झाल्यानंतर पालघरच्या घटनेवर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

'एका घटनेच्या आधारे महाराष्ट्राचा नावलौकिक खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. '

'एका घटनेच्या आधारे महाराष्ट्राचा नावलौकिक खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. '

'एका घटनेच्या आधारे महाराष्ट्राचा नावलौकिक खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. '

  • Published by:  Manoj Khandekar

मुंबई, 21 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनाबाबत असलेल्या राज्यातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर फेसबुक लाईव्हद्वारे लोकांशी संवाद साधला. 'राज्यातील कोरोनाची आकडेवारी चिंताजनक आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे. काळजी घ्या...घराबाहेर पडणं टाळा. गाईडलाईन्स पालन करणं गरजेचं आहे. सर्वांना विनंती आहे की संकटांच्या संबंधी निगेटिव्ह विचार करणं सोडून द्या...आपण सामना करणार आहोत आणि जिंकणार आहोत...त्यामुळे लोकांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे,' असं म्हणत शरद पवार यांनी राज्यातील जनतेला दिलासा दिला. यावेळी शरद पवार यांनी पालघर हत्याकांडावरही भाष्य केलं.

'एका घटनेच्या आधारे महाराष्ट्राचा नावलौकिक खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पालघरला झालं त्याचा आणि कोरोनाचा काही संबंध नाही. पालघर प्रकरणाचा संबंध शोधण्यासाठी जी काही नेमणूक करायची आहे ती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्य सरकारने खबरदारी घेतली आहे. असा एखादा प्रकार गैरसमजुतीनं घडला की लगेच राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. घडलेलं प्रकरण निषेधार्ह आहे. ते घडायला नको होतं. पण यामध्ये कोणीही राजकारण करू नये,' अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे.

काय आहे पालघरमधील हत्या प्रकरण?

पालघरमधील गडचिंचले गावात जमावाकडून दोन साधू आणि त्यांच्या चालकाची हत्या करण्यात आली. पालघरमधील दाभाडी-खानवेल मार्गावर नाशिककडून येणाऱ्या एका वाहनाला ग्रामस्थांनी रोखलं होतं. या प्रवाशांची विचारपूस पूर्ण ऐकून घेण्याच्या आतच ग्रामस्थांनी दगडफेक करायला सुरुवात केली.

मुख्यमंत्र्यांनीही केलं होतं भाष्य

पालघर हत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. 'साधू आणि त्यांच्या चालकाची निघृण हत्या झाली. निर्जण आणि दुर्गम परिसरात हे गाव आहे. घटना घडताच आपले एसपी तिथे पोहोचले. 16 तारखेला ही घटना घडल्यानंतर 17 तारखेला आरोपींना अटक केली. मुख्य 5 आरोपीही तुरुंगात आहेत. या प्रकरणातील कोणालाच सोडणार नाही. कोणी आग लावण्याचा प्रयत्न करू नये,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

एकूलती एक मुलगी आणि 100 किमी पायी प्रवास, हाकेच्या अंतरावर घर असताना मृत्यू

'कोरोनाविरुद्ध युद्ध ही आपली प्राथमिकता आहे. पण पालघर जिल्ह्याच्या टोकाला दादरा-नगर हवेलीच्या सीमेवर एक दुर्दैवी प्रकार घडला. या काळात सर्वांनी माणुसकी ठेवण्याची गरज आहे. केंद्र शासित प्रदेशात त्यांना प्रवेश नाकारला गेला. गडचिंचली हे गाव तिथे जायला नीट रस्ता नाही. या घटनेनंतर कारवाई सुरू असून दोन पोलिसांनीही निलंबित केलं आहे. आरोपींना शोधून काढणार शिक्षा करणार. हा धार्मिक हिंसाचार नाही, अफवेमुळे प्रकार घडला,' अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

मन हेलावून टाकणारा VIDEO, भूक भागवण्यासाठी मुलं खाताय बेडकं

दरम्यान, पालघर प्रकरणावरून राजकीय गदारोळही सुरू झाला होता. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून भाजपच्या इतर नेत्यांनीही या प्रकरणावरून राज्य सरकारला कोंडीत पकडत चौकशीची मागणी केली होती. तसंच त्यानंतर पालघर घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल महाराष्ट्र सरकारकडे मागितला आहे, अशी माहिती आहे.

First published: