Home /News /mumbai /

'अयोध्येनंतर आता...' शरद पवारांनी 'या' चर्चेबद्दल व्यक्त केली चिंता, म्हणाले...

'अयोध्येनंतर आता...' शरद पवारांनी 'या' चर्चेबद्दल व्यक्त केली चिंता, म्हणाले...

'ज्यावेळी बाबरी मशिदीच्या विध्वंसाचा प्रकार झाला त्यावेळी मी केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री होतो, विषय माझा नव्हता. पण मला आठवतंय...'

  मुंबई, 03 ऑक्टोबर : 'अयोध्येनंतर आता काशी, मथुरा अशीही चर्चा सुरू झाल्याचे दिसते. त्यामुळे देशाचे सामाजिक ऐक्य कसे टिकणार याची काळजी आम्हा सगळ्यांनाच वाटते आहे', असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. बाबरी मशीद प्रकरणाचा 28 वर्षांनंतर निकाल लागला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निकालानंतर शुक्रवारी शरद पवार यांनी ट्वीट करून या निकालामुळे सुरू झालेल्या चर्चेवर भाष्य केले आहे. 'ज्यावेळी बाबरी मशिदीच्या विध्वंसाचा प्रकार झाला त्यावेळी मी केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री होतो, विषय माझा नव्हता. पण मला आठवतंय नरसिंह राव, शंकरराव चव्हाण आणि आम्हा सहकाऱ्यांच्या कानावर तेव्हाचे केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी काही वस्तुस्थिती घातली होती. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी अभिवचन दिलं होतं की, या बाबरी मशिदीच्या वास्तूला धक्का बसणार नाही. पण हे अभिवचन पाळलं जाणार नाही, असं मत तेव्हाचे केंद्रीय गृह सचिव म्हणून माधव गोडबोले यांनी मांडलं होतं. पण नरसिंह राव उत्तर प्रदेशच्या तेव्हाच्या राज्यप्रमुखांच्या विधानावर विश्वास ठेवला पाहिजे, या मताचे होते. त्यामुळे गोडबोलेंच्या मताचा स्वीकार झाला नाही. दुर्दैवाने त्याची परिणती जे गोडबोलेंना वाटत होतं त्यामध्येच झाली' असं शरद पवार म्हणाले. 'माधव गोडबोले केंद्रीय गृह सचिव असल्याने त्यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास आधीच केला होता. नंतर काय होईल याचीही खात्री त्यांना होती व नंतर जे घडलं ते त्यांनी डोळ्याने पाहिलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाबाबत मनातली अस्वस्थता माध्यमांकडे नमूद केली त्याबद्दल मला आश्चर्य वाटलेलं नाही, असंही पवार यांनी सांगितले. Hathras Case:जिल्हाधिकाऱ्याने वडिलांच्या छातीवर मारली लाथ,पीडितेच्या भावाचा आरोप 'आता काशी, मथुरा अशीही चर्चा सुरू झाल्याची दिसते. त्यामुळे देशाचे सामाजिक ऐक्य कसे टिकणार याची काळजी आम्हा सगळ्यांनाच वाटते आहे.' अशी चिंता शरद पवार यांनी व्यक्त केली. काय आला बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल दरम्यान, 30 सप्टेंबर रोजी लखनऊ येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. यावेळी साध्वी ऋतंभरा यांच्यासमवेत 18 आरोपी कोर्टात उपस्थित होते तर लालकृष्ण अडवाणी यांच्यासह काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी तब्बल 2000 पानांचा निकाल कोर्टात वाचण्यात आला. कोर्टाने यावेळी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करत, हा पूर्वनियोजित कट नसल्याचे जाहीर केले आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी याचबरोबर उमा भारती यांचीही निर्दोष मुक्तता झाली केली.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: NCP, Sharad pawar

  पुढील बातम्या