फडणवीसांना लवकरच कंठ फुटला, शरद पवारांची सडकून टीका

फडणवीसांना लवकरच कंठ फुटला, शरद पवारांची सडकून टीका

'आम्ही वाट बघतो आहे मंत्रिमंडळ कधी तयार होतो आहे, शेवटी हा अधिकार मुख्यमंत्री यांचा आहे.'

  • Share this:

मुंबई 23 डिसेंबर : झारखंडच्या विधानसभा निकालांमुळे भाजपला धक्का बसलाय. आता थेट शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय. झारखंडमधल्या आदीवासी जनतेनं जो निर्णय घेतला तो स्वागतार्ह आहे. ही जनतेची भाजप विषयीची ही नापसंती आहे. भाजपने देशात धार्मिक अंतर वाढवण्याचा प्रकार सुरू आहे. पंतप्रधान म्हणतात हा विषय मंत्रिमंडळात मांडला नाही पण अमित शहांनी राज्यसभेत NRCचा मांडला त्यामुळे खरं कोण आणि खोटं कोणं बोलतंय हे लोकांना कळतंय. सरकारला सर्व विषयांवर अपयश आल्याने ते अपयश झाकण्यासाठी हा CAA आणि NRC असे विषय काढले जात आहेत. देशात फुट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय असा गंभीर आरोपही शरद पवारांनी केलाय. त्याचबरोबर उद्धव ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या फडणवीसांवरही त्यांनी सडकून टीका केली.

भाजपला उतरती कळा लागली असून ती आता कुणीही थांबवू शकत नाही असंही पवारांनी सांगितलंय. सर्व विरोधक एकत्र आले तर नरेंद्र मोदी यांना हरवणं हे अवघड नाही असंही पवारांनी सांगितलं.  आम्ही वाट बघतो आहे मंत्रिमंडळ कधी तयार होतो आहे, शेवटी हा अधिकार मुख्यमंत्री यांचा आहे असं शरद पवारांनी सांगितलं. तर विरोधी पक्ष नेत्याला लवकर कंठ फुटला, जरा वाट बघा, अगदी 15 दिवसात या सरकारने धाडसी निर्णय घेतला असं मतही त्यांनी व्यक्त केलं. झारखंडमधल्या निवडणुकीने भाजपचा अहंकार गेला अशी टीकाही त्यांनी केली.

रोहित पवारांचाही भाजपवर निशाणा

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी झारखंडमधल्या निकालांवरून भाजपवर निशाणा साधलाय. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही त्यांना सत्ता राखता आली नाही. शिवसेना ज्यांच्या विरोधात लढली त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत त्यांनी सरकार स्थापन केलं. भाजपविरोधात सगळे पक्ष एकत्र आलेत. महाराष्ट्रातल्या या प्रयोगाची देशभर चर्चा होतेय. त्यावरून रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

रोहित पवार म्हणाले, झारखंड निवडणुकांमध्ये क्राँगेस व मित्रपक्ष आघाडीवर असल्याची बातमी आहे. जसे महाराष्ट्रात चित्र बदललं त्याचप्रमाणे झारखंडचे चित्र असेल. कुठेतरी महाराष्ट्राने केलेली ही सुरवात झारखंड पासून अन्य राज्यात देखील दिसेल. झारखंडमधील काँग्रेस व मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन.

राष्ट्रवादीसाठी झारखंडमधून आनंदाची बातमी, विधानसभेत घड्याळाची टिकटिक

2014मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजपने काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा केली होती. त्यानंतर एक एक राज्य मिळवत बहुसंख्य राज्यात सत्ता मिळवली होती. मात्र प्रत्येक वेळी राजकारणात विजय मिळतोच असं नाही. त्यानंतर आता अनेक राज्य भाजपच्या हातातून जात आहेत त्यामुळे भाजपवर टीका करण्याची संधी रोहित पवारांनी सोडली नाही.

झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या युतीने भाजपला मागे टाकलं आहे. त्यामुळे झारखंड हेही भाजपच्या हातातून जाण्याची चिन्हं आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांपाठोपाठ हे राज्यही भाजपच्या हातातून निसटताना दिसतंय.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 23, 2019, 4:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading