मुंबई, 21 मार्च : मुंबईचे (Mumbai Police)माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी लेटर बॉम्ब टाकून महाविकास आघाडी सरकारमध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. अखेर या प्रकरणाची दखल घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवार सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहे. झालेल्या प्रकारानंतर शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पाठवलेल्या पत्रासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहितीसमोर आली आहे.
मुंबईतील टिळकनगर पोलीस स्टेशनच्या समोरच सुरू होता हुक्का पार्लर
माजी पोलीस आयुक्त यांनी गंभीर आरोप देशमुख यांच्यावर केले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाची भूमिका आणि पुढील भूमिका यावर शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
गृहमंत्र्यांनी अनिल देशमुख यांनी शरद पवार यांना या प्रकरणा संदर्भात संपूर्ण माहिती दिली. शरद पवार दिल्लीत असून आज दूरध्वनीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, परमबीर सिंग यांच्या पत्रावर जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडत अनिल देशमुख यांनी बाजू घेतली.
मुंबई स्फोटकांनी भरलेली कार सापडली आणि त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मृत्यू झालाय या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएकडे देण्यात आला आहे. सध्याचा तपास ज्या पद्धतीने सुरू आहे तो योग्य पद्धतीने तपास चालू आहे. पण हा सगळा जो प्रकार आहे. त्यावरून लक्ष हटवण्याचा कुठेतरी विषय असल्याचे आजच्या परमवीर सिंगच्या पत्रावरून जाणवतंय. पत्रात कुणाची सहानुभूती हे पत्र लिहले आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी कडक धोरण घेतल्यानंतर हे पत्र समोर आले. त्यामुळे या पत्राबाबत अनेक शंका आहेत, असं वक्तव्य राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी केलं.
राणी मुखर्जीचा आवाज ठरला होता वादाचा मुद्दा, 'या' सिनेमासाठी डब करावा लागला आवाज
'या परिस्थितीमध्ये सुद्धा सरकार खंबीर आहे. कोणतीही अडचण सरकारला येणार नाही. योग्य तो तपास केला जाईल, असंही जयंत पाटील म्हणाले.
मुंबईतील मायकल रोडवर ठेवलेली वाहन आणि मनसुख हिरेन यांचा खून कितीही मोठा अधिकारी असला तरी त्या आरोपीला हुडकून काढला पाहिजे. अधिकाऱ्यांनी स्वतःचे काम व्यवस्थित करायचे असते. काही अधिकारी असतात. पण राज्याचे विरोधी पक्ष नेते अविर्भाव आणतात तशी परिस्थिती नाही. राज्याचे पोलीस दल सक्षम आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी फडणवीस यांना लगावला
IND vs ENG : डेव्हिड मलानचा विक्रम, विराट-बाबरला मागे टाकलं
गृहमंत्री यांच्या राजीनामा विरोधक मागताय पण विरोधकांचे काम काय आहे, ते करणारच, चौकशीतून सत्य बाहेर आल्यानंतर पुढे कारवाई केली जाईल, असं जयंत पाटील म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.