News18 Lokmat

'जेव्हा शरद पवार माझ्या सभेला आले त्यावेळी माझा विजय झाला'

जेव्हा शरद पवार माझ्या सभेला आले त्यावेळी माझा विजय झाला, अशा शब्दात काँग्रेसचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मिलिंद देवरा यांनी आगामी निवडणुकीतील विजयाबद्दल आशावाद व्यक्त केला.

News18 Lokmat | Updated On: Apr 9, 2019 09:39 PM IST

'जेव्हा शरद पवार माझ्या सभेला आले त्यावेळी माझा विजय झाला'

मुंबई, 09 एप्रिल: जेव्हा शरद पवार माझ्या सभेला आले त्यावेळी माझा विजय झाला, अशा शब्दात काँग्रेसचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मिलिंद देवरा यांनी आगामी निवडणुकीतील विजयाबद्दल आशावाद व्यक्त केला. देवरा यांच्या यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

भायखळा येथील देवरा यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटनावेळी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. मोदींनी देशातील जनतेचा भरवसा सोडला. ते विकासाचा रस्ता दाखवतील असे वाटत होते. पण विकासासाठी ते अपयशी ठरले आहेत. एकेकाळी विकास, विकास बोलणाऱ्या मोदींकडे हिंदू-मुस्लिम याशिवाय मुद्देच नाहीत. आता मोदी आणि भाजपकडे विकासाचे सांगण्यासारखे काही नाही. त्यामुळे त्यांना धर्म आठवतोय, अशी टीकाही पवारांनी केली.काँग्रेस पक्षाने कधीच एका धर्माला हाताशी घेऊन दुसऱ्या धर्माला टार्गेट केले नाही. नॅशनल कॉन्फरन्स ही आता दहशतवादी वाटते तर सरकरामध्ये कोण होत. ते तुमच्या सोबत होते तेव्हा देशभक्त आणि विरोधात गेल्यावर देशद्रोही कसे होतात, असा सवाल पवारांनी विचारला. गेल्या काही दिवसांपासून मोदी सातत्याने शरद पवारांवर टीका करत आहेत. त्यावर बोलताना पवार म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून मोदींनी शरद पवारांचे स्वप्न पडू लागले आहेत.

Loading...

मोदी गांधी-नेहरु कुटुंबावर आरोप करत आहेत. पण मोदींना हे माहित नसावे स्वातंत्र्य चळवळीमध्ये जवाहरलाल नेहरु 11 वर्ष तुरुंगात होते. या देशाची रचना नेहरुंनी केली आहे. त्यामुळे भारतात कधीही हुकुमशाही येऊ शकत नाही, असे देखील पवारांनी सांगितले. तसेच या देशात इंदिरा गांधी यांनी इतिहास नाही तर भूगोल घडवल्याचे पवार म्हणाले.


VIDEO: पराभवाच्या भीतीने महाआघाडीतले पक्ष एकत्र; मोदींचा महाआघाडीला टोला


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 9, 2019 09:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...