मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /अखेर ती भेट झालीच! प्रवीण दरेकर आणि शरद पवारांमध्ये मनमोकळा संवाद

अखेर ती भेट झालीच! प्रवीण दरेकर आणि शरद पवारांमध्ये मनमोकळा संवाद

एका कार्यक्रमात आज शरद पवार आणि प्रवीण दरेकर यांची भेट झाली.

एका कार्यक्रमात आज शरद पवार आणि प्रवीण दरेकर यांची भेट झाली.

एका कार्यक्रमात आज शरद पवार आणि प्रवीण दरेकर यांची भेट झाली.

मुंबई, 30 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर घणाघाती टीका केली. ही टीका प्रवीण दरेकर यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आणि त्यांनी पवार यांना भावुक पत्र लिहिलं. या सगळ्या घटनाक्रमानंतर आता या दोन नेत्यांमध्ये भेट झाली आहे.

एका कार्यक्रमात आज शरद पवार आणि प्रवीण दरेकर यांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्याचं पाहायला मिळालं. दरेकर यांचं पुस्तक मिळालं नसल्याचं पवारांनी सांगताच दरेकरांनी तात्काळ पुस्तक सिल्व्हर ओकला पाठवलं असल्याची माहिती आहे.

पवारांचा वार आणि दरेंकरांचं उत्तर

शेतकरी आंदोलनावरून टीका करणाऱ्या प्रवीण दरेकर यांचा शरद पवार यांनी खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतला होता. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी थेट शरद पवार यांनाच सविस्तर पत्र लिहित या टीकेला उत्तर दिलं होतं. तसंच विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्या एक वर्षाच्या कार्याचा लेखाजोखा घेणारं पुस्तकही त्यांनी शरद पवार यांना पाठवलं होतं.

हेही वाचा - 'APMC आणि मंडीच्या सुधारणांना विरोध नाही, पण...', शरद पवारांनी सांगितले नव्या कायद्यांचे दुष्परिणाम

"हे पुस्तक नजरेखालून घातल्यानंतर 'आपण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होतो', याबद्दल आपणास कधीही वाईट वाटणार नाही किंवा या पदाचं अवमुल्यन झाल्याचं शल्यही आपल्याला राहणार नाही. या बद्दल मला विश्वास आहे. तसंच आपल्या सूचना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी नेहमीच नवऊर्जा ठरतात," असं दरेकर यांनी शरद पवार यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केलं होतं.

First published:

Tags: Pravin darekar, Sharad pawar