• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये तासभर खलबतं; बैठकीत काय ठरलं? वाचा INSIDE STORY

मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये तासभर खलबतं; बैठकीत काय ठरलं? वाचा INSIDE STORY

Sharad Pawar meet CM Uddhav Thackeray: वर्षा निवासस्थानी आज हायलेव्ल बैठका पहायला मिळाल्या. शरद पवारांनी आज वर्षावर जात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

  • Share this:
मुंबई, 29 जून: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आज सकाळपासूनच विविध घडामोडी घडत असल्याचं पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्याचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर (Varsha Bungalow) ही भेट झाली. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? यावर विविध चर्चा रंगत आहेत. बैठकीत नेमकी काय चर्चा? शरद पवार हे सायंकाळच्या सुमारास वर्षा बंगल्यावर दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. मात्र, असं बोललं जात आहे की, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये तसेच मंत्र्यांमध्ये असलेल्या नाराजीच्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली अशी माहिती समोर येत आहे. शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; पवार-उद्धव ठाकरेंमध्ये 'वर्षा'वर खलबतं महाविकास आघाडी सरकारमध्ये जे काही मतभेद किंना नाराजी होती त्यावर चर्चा झाली असून आता हे नाराजीनाट्य संपलं असल्याचं वर्षावरील वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय घेताना काही मंत्री थेट निर्णय घेतात. मुख्यमंत्र्यांना कळवत नाहीयेत त्या संदर्भातही चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी चर्चा झाली. ज्या काही अडचणी आहेत त्या संवादाने सोडवल्या जाऊ शकतात आणि त्यावरच बैठकीत चर्चा झाली. महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद असू नये आणि सरकारची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी दोन्ही पक्षांचे प्रमुख एकत्र आले. यासोबतच राज्यातील इतरही काही प्रश्नांवर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीची बैठक सुरू शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्वपूर्ण बैठक सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपास्थित ही बैठक होत आहे. या बैठकीत जयंत पाटील राजेंद्र शिंगणे, राजेश टोपे, अजित पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, नवाब मलिक, सुनील तटकरे यांच्यासह सर्व मंत्री बैठकीला हजर आहेत. महिन्याभरात झालेले निर्णय आणि कामकाजाचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात येत आहे.
Published by:Sunil Desale
First published: