शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातली बैठक संपली

शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातली बैठक संपली

या बैठकीत विधान परिषद आणि गुजरात निवडणुकीच्या बाबत चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिलीये.

  • Share this:

23 नोव्हेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील बैठक संपलीये. शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात 2 तास बैठक झाली. या बैठकीत विधान परिषद आणि गुजरात निवडणुकीच्या बाबत चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिलीये.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज संध्याकाळी साडे आठ वाजता सह्याद्री अतिथी गृहावर  बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातल्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.  विधान परिषद च्या एका जागेसाठी नारायण राणे यांच्या नावावर एकमत व्हावं या साठी भाजपची विविध पक्षा कडे मोर्चे बांधणी सुरू आहे त्याबाबत ही या बैठकीत चर्चा झाल्याचं समोर येताय. त्याच बरोबर गुजरात निवडणूक आणि आगामी विधी मंडळाचं अधिवेशन या विविध मुद्याचार चर्चा झाल्याची समोर येताय. पण ही बैठक मुंबई क्रिकेट असोसिएशनचे च्या प्रश्नाबाबत झाल्याचं पक्षा कडून सांगण्यात येताय.

विशेष म्हणजे, भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी फिल्डिंग लावली आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'मातोश्री'वर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतलीये.

First published: November 23, 2017, 10:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading