'शरद पवार आणि अजित पवार म्हणजे ठग्ज् ऑफ ठेवीदार'

'शरद पवार आणि अजित पवार म्हणजे ठग्ज् ऑफ ठेवीदार'

' शरद पवार आणि अजित पवार हे ठेविदारांचे ठग आहांत या निवडणुकीत याबाबतचा प्रश्न आम्ही राष्ट्रवादीला विचारणार आहोत.'

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 01 ऑक्टोंबर : राज्य सहकारी शिखर बँक घोटाळा प्रकरणावरून भाजपचे नेते आशीष शेलार यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर घणाघाती हल्ला केलाय. ठेविदारांचे पैसे बुडाले आहेत. त्यामुळे ते प्रश्न विचारणारच हा मुद्दा आम्ही निवडणुकीच्या प्रचारात उतरविणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शरद पवार आणि अजित पवार हे ठग आहेत अशी कठोर टीकाही त्यांनी केली. शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने जी टिप्पणी केली त्यावरही त्यांनी आपली भूमिका मांडली. शरद पवार आणि अजित पवार यांच्याबद्दल बोलताना शेलार म्हणाले, तुम्ही ठग आहांत, ठेवीदारांचे ठग आहांत. या निवडणुकीत याबाबतचा प्रश्न आम्ही राष्ट्रवादीला विचारणार आहोत. काकांना त्रास होतो तेव्हा पुतण्या राजीनामा देतो मात्र मुलगी राजीनामा देत नाही.  EDमध्ये शरद पवार जाणार होते त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने जसं आकांडतांडव केलं तसं पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस करतील का असा सवाल त्यांनी केला.

भाजपच्या पहिल्या यादीतले 'हे' आहेत नवीन चेहेरे!

शेलार पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशचा सन्मान आम्ही करतो. फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि चौकशी करा असं सर्वोच्च न्यायालयाने कुठेही म्हंटलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा तक्रार लक्षात घेता बाजू मांडायला सांगितलं आहे. न्यायालयाचा निवाडा येईपर्यंत थांबलं पाहिजे. एका मोकळ्या जागेवर झोपडपट्टी आणि घरे बसवली गेली, यावर कर लावावा अशी मागणी नगरसेवक असलेल्या फडणवीस यांनी केलेली होती. कर लावावा म्हणून पत्र लिहिलं याबाबत खाजगी गुन्हा दाखल केला गेला.

मुख्यमंत्री फडणवीस यांना SCकडून धक्का; ऐन विधानसभा निवडणुकीत दाखल होणार खटला!

सरकारी अधिकाऱ्याने आमदार फडणवीस यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला, तक्रार दाखल केली.  ही दोन्ही प्रकरणे ट्रायल कोर्टाने नाकारली. तेव्हा दुसऱ्या प्रकरणात सत्र न्यायालयात आव्हान दिलं. यामध्ये ट्रायल कोर्टाने स्पिकिंग ऑर्डर दिली म्हणून प्रकरणाचा विचार करावा असं म्हंटलं. तेव्हा फडणवीस उच्च न्यायलायत गेले. त्यावर संबंधित व्यक्ती सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यावर पुन्हा म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यावेळी पाऊल फडणवीस यांनी उचलले होते असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 1, 2019, 5:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading