समृद्धी महामार्गाच्याविरोधात शरद पवार मैदानात, 12 जूनला औरंगाबादेत घेणार मेळावा

समृद्धी महामार्गाच्याविरोधात शरद पवार मैदानात, 12 जूनला औरंगाबादेत घेणार मेळावा

सरकारनं शेतकऱ्यांची संमती न घेताच जमिनींची मोजणी केल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय.

  • Share this:

30 मे : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या विरोधात आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहे. ळण

मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी समृद्धी महामार्गाला ठाम विरोध दर्शवला. शहापूरमध्ये महामार्ग जाणार असलेल्या मार्गाच्या बाजूला अधिकाऱ्यांनी जागा घेतल्या असं ऐकतो असं असेल तर चौकशी व्हावी अशी मागणी करत सरकार शेतकऱ्यांवर दडपशाही करतेय असल्याचंही पवारांनी म्हटलंय.

तसंच 12 जूनला समृद्धी महामार्गातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा औरंगाबादमध्ये मेळावा घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. शिवसेनेचा समृद्धी महामार्गाला विरोध असताना आता पवारांनीही समृद्धी महामार्गाला विरोध केल्यानं सरकारची अडचण झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2017 07:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading