मुंबई, 28 सप्टेंबर : मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आज सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दोघांमध्ये ही भेट झाली. या भेटीमागील कारण अद्याप समोर आलेलं नाही.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आता शरद पवार व विश्वास नांगरे-पाटील यांच्या भेटीनंतर नवी चर्चा सुरू झाली आहे. बराच काळ त्यांच्यात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
हे ही वाचा-राऊत-फडणवीस भेटीमुळे सेनेत पडसाद, भाजपबद्दल नेत्यांनी उपस्थिती केले सवाल
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. दोघांमध्ये बराच काळ चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विश्वास नांगरे-पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. सलग दुसऱ्या दिवशीच्या या ‘भेटीसत्रा’मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अद्याप या बैठकांमागील नेमकं कारण समोर आलेलं नाही.
हे ही वाचा-राऊत-फडणवीस भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी घेतली आमदारांची बैठक, नेमकं काय घडलं?नांगरे पाटील यांची मुंबईत बदली
उद्धव ठाकरे सरकारने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच 40 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. या बदलीत नाशिक पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणारे विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. त्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी मुंबईत पदभार स्वीकारला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.