मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /शरद पवार हॉस्पिटलमध्ये दाखल, भाजप नेते म्हणाले, 'साहेब, बरे व्हा, आधारवड आहात तुम्ही'

शरद पवार हॉस्पिटलमध्ये दाखल, भाजप नेते म्हणाले, 'साहेब, बरे व्हा, आधारवड आहात तुम्ही'

अमित शहा (Amit Shah) आणि शरद पवार (Sharad pawar) यांच्या गुप्त भेटीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे

अमित शहा (Amit Shah) आणि शरद पवार (Sharad pawar) यांच्या गुप्त भेटीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे

अमित शहा (Amit Shah) आणि शरद पवार (Sharad pawar) यांच्या गुप्त भेटीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे

मुंबई, 29 मार्च : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांच्या अहमदाबाद येथील गुप्त भेटीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. शरद पवार रुग्णालयात दाखल(Breach Candy Hospital, Mumbai) झाले असून भाजपच्या नेते प्रवीण दरेकर  (Praveen Darekar) यांनी 'राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील 'आधारवड' आहात तुम्ही' असं म्हणत सदिच्छा दिल्या आहे.

भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे आमदार अतुळ भातखळकर आणि प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करून शरद पवार यांना आजारातून लवकरचे बरे व्हावे, अशा सदिच्छा दिल्या आहे.

प्रवीण दरेकर यांनी मोजक्याच शब्दात ट्वीट केले आहे. ते म्हणाले की, पवार साहेब लवकर बरे व्हा! नियोजित शस्त्रक्रिया यशस्वी होऊन आपण लवकर बरे व्हावे, हीच ईश्वराकडे प्रार्थना. पक्षभेदापलीकडचे प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांचे 'मार्गदर्शक' आहात तुम्ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील 'आधारवड' आहात तुम्ही' असं सूचक विधान केले आहे. आधारवड आणि मार्गदर्शक शब्दांवर जोर दिल्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

तर अतुळ भातखळकर यांनीही 'शरद पवार यांची शस्त्रक्रिया यशस्वी होवो व ते लवकरात लवकर बरे होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना' अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

तर चित्रा वाघ यांनी 'साहेब....लवकर बरे व्हा हि श्री स्वामींचरणी प्रार्थना.' अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

विशेष म्हणजे, राज्यात महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले असताना अहमदाबादमध्ये शरद पवार आणि अमित शहा यांची गुप्त बैठक झाल्याची बातमी समोर आली. त्यामुळे भाजप नेत्यांमध्ये आशादायी चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळेच एरवी एकही टीकेची संधी न सोडणारे भाजप नेते आता शरद पवार यांच्यासाठी ट्वीट करून वेगळेच संकेत देत आहे.

First published:

Tags: शरद पवार