मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती

शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती


पोटात दुखू लागल्यामुळे आज सकाळी शरद पवार हे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आले होते.

पोटात दुखू लागल्यामुळे आज सकाळी शरद पवार हे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आले होते.

पोटात दुखू लागल्यामुळे आज सकाळी शरद पवार हे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आले होते.

मुंबई, 29 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे  (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांना पोटात दुखत असल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital) तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती उत्तम असून बुधवारी एक शस्त्रक्रिया होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी दिली.

पोटात दुखू लागल्यामुळे आज सकाळी शरद पवार हे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आले होते. त्यांना पित्ताशयाचा त्रास होत होता. डॉक्टरांनी शरद पवार यांची तपासणी केली आहे. पित्ताशयाचा त्रास जास्त जाणवत असल्यामुळे बुधवारी 31 मार्च रोजी शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. शरद पवार यांना पोटात दुखू लागल्यामुळे रुग्णालयात तपासणी करण्यासाठी आले होते. पण, पित्ताशयाचा त्रास अधिक जाणवू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 31 मार्च रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यानंतर पुढील 2 आठवडे ते घरीच विश्रांती करणार आहे, या काळात त्यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

प्रसिद्ध गायिका वैशाली माडे हाताला बांधणार राष्ट्रवादीचं घड्याळ; मराठी बिग बॉस..

तसंच, शरद पवार यांना पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

दरम्यान, ब्रीच कँडीमध्ये तपासणी झाल्यानंतर पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दोन दिवस औषधे बंद करण्यात आली आहे. शिवाय 31 मार्चला अँडोस्कोपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया केली जाईल. त्यामुळे शरद पवारसाहेबांचे आजपासूनचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती नवाब मलिक यांनी  दिली.

First published:

Tags: Supriya sule, शरद पवार, सुप्रिया सुळे