संकटांच्या मालिकांना तोंड देणारं सरकार संबोधून शरद पवारांनी केलं मुख्यमंत्र्यांच कौतुक

संकटांच्या मालिकांना तोंड देणारं सरकार संबोधून शरद पवारांनी केलं मुख्यमंत्र्यांच कौतुक

महाविकास आघाडी सरकार स्थापन होत नाही तोच सरकारसमोर अनेक संकटं आली. मात्र सरकार डगमगलं नाही

  • Share this:

मुंबई, 3 डिसेंबर: महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aaghadi Government) स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झालं. या वर्षपूर्तीनिमित्त सरकारच्या कामगिरीचा अहवाल 'महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही' या पुस्तक रूपात प्रकाशित करण्यात आला. संकटांच्या मालिकांनी तोंड देणारं सरकार असं संबोधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारचे कौतुक केलं. 'सह्यादी'  अतिथिगृहात हा सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सरकारमधील अनेक मंत्री, नेते उपस्थित होते.

महाविकास आघाडी सरकार स्थापन होत नाही तोच सरकारसमोर अनेक संकटं आली. मात्र सरकार डगमगलं नाही, यातून सरकारनं आपला जगन्नाथाचा रथ पुढे नेत राहिलं, असं शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.

हेही वाचा...फक्त 2 दिवसांचं हिवाळी अधिवेशन, सरकार चर्चेपासून पळ काढतेय, भाजपचा थेट आरोप

शरद पवार म्हणाले, ज्यांनी शंका उपस्थित केली. त्यांच्या सत्ता गेल्यानंतरही अस्वस्थता पाहायला मिळाली. शेती, शेतकरी, संकटात होते. अनेक संकटातून सरकार बाहेत पडेल की नाही याची चारच्या दबक्या आवाजात होती. पण सरकारमधील सगळ्यांनी जबाबदारीने काम केलं.  सरकारमध्ये उत्तम चळवळ आहे. तिन्ही पक्षातील नेत्यामध्ये चांगल्याप्रकारे समन्वय आहे. पुढची 5 आणि 25 वर्षे हा सरकारचा गाडा चालवायचा आहे, अशा विश्वास देखीव शरद पवार यांनी व्यक्त केला.

'सरकारचा प्रत्येक प्रतिनिधीचं उत्तम काम करत आहे. राज्य सरकार खंबीरपणे काम करत आहे. सत्तेत आल्यानंतर संकटांची मालिका सुरू झाली.  कोरोना काळात सरकार डगमगलं नाही. जनतेची संकटात सरकारला साथ दिली. त्यामुळे हे शक्य झालं. प्रत्येकानं जबाबदारी समर्थपणे सांभाळली. सरकारमध्ये चांगला समन्वय असून राज्याला संकटातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.

सरकारनं ज्या राज्यांनी त्यांना पुढे येऊ दिलं नाही, अशा रागात सरकारची परिस्थिती पाहायला मिळाली. अर्थव्यवस्था संकटात पडली आहे.

उद्योगाचं महत्त्वाचं राज्य आर्थिक संकटात सापडलं. उद्योगावर परिणाम झाला आणि याचा संपूर्ण देशाच्या आर्थिक चक्रावर परिणाम झाला.

अशा संकटात सर्वसामान्य जनतेनं जगन्नाथाचा रथ ओढायला साथ दिली. निवडणुका , स्थानिक स्वराज्य निवडणुका काय असतात जे सांगायला नको. लोकांचा पाठिंबा कोणाला आहे हे स्पष्ट होईल, असं शरद पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा...आमच्या सरकारमध्ये कुठेही अडेलतटूपणा नाही, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सणसणीत टोला

3 पक्षाचा सरकार आहे ते चालवायला समंजसपणा हवा. उद्धव ठाकरे सरकारकडे लोक उत्सुकतेने पाहत होते.भुजबळासारखे अनेक लोक आहेत ज्यांना सत्तेचा अनुभव आहे. त्यामुळे पुढची 5 आणि 25 वर्षे हा सरकारचा गाडा चालवायचा आहे, अशा विश्वास शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.

Published by: Sandip Parolekar
First published: December 3, 2020, 6:23 PM IST

ताज्या बातम्या