मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

पूजा चव्हाणच्या आई-वडिलांवर शांता राठोड यांचा गंभीर आरोप, केला मोठा गौप्यस्फोट

पूजा चव्हाणच्या आई-वडिलांवर शांता राठोड यांचा गंभीर आरोप, केला मोठा गौप्यस्फोट

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना आपल्या वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण,

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना आपल्या वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण,

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना आपल्या वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण,

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 01 मार्च : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना आपल्या वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण, दुसरीकडे पूजा चव्हाणची चूलत आजी शांता राठोड यांनी पूजाच्या आई वडिलांवरच गंभीर आरोप केला आहे. प्रकरण दडपण्यासाठी संजय राठोड यांच्याकडून 5 कोटी रुपये घेतले, असा आरोपच शांता राठोड यांनी केला आहे.

'शांता राठोड यांनी एक व्हिडीओ शेअर करून पूजा चव्हाणच्या आई-वडिलांवरच आरोप केला आहे. रविवारी पूजा चव्हाणचे आई वडील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. पण, ते जे काही दावा करत आहे, त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी संजय राठोड यांनी त्यांना 5 कोटी रुपये दिले आहे. पूजाचे आई-वडील मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत आहे', असा आरोप शांता राठोड यांनी केला आहे.

'पूजाला न्याय मिळावा म्हणून मी पहिल्या दिवशीपासून लढा देत आहे. पण हे प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. संजय राठोड यांच्याकडून त्यांनी 5 कोटी रुपये घेतले आहे. घरातच त्यांनी पैसे पुरून ठेवले आहे. त्यांच्या घरात जावया-जावयांमध्ये भांडण सुरू आहे. पूजाचे आई-वडील हे पैशापोटी बोलत आहे, मुख्यमंत्र्यांनी पूजाला योग्य तो न्याय द्यावा', अशी विनंतीही शांता राठोड यांनी केली आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण हिचे आई-वडील आपल्याला भेटले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या भेटीत त्यांनी माझ्याकडे एक पत्र दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

काय आहे पूजाच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या पत्रात?

"आमची मुलगी कु. पूजा चव्हाण हिचा दिनांक 7 फेब्रुवारी रोजी दुर्देवी मृत्यू झाला. कुठल्याही माता पितासाठी आपल्या पोटच्या गोळ्याचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी असतो. आमची ही वेदना आता कधीही भरून येणार नाही. मुलीच्या अकाली मृत्यूचा दु:खापेक्षा अधिक त्रासदायक व आक्षेपार्ह म्हणजे माझ्या मुलीच्या मृत्यूसंदर्भात जी चर्चा होत आहे. तिच्यावर खूप गलिच्छ आरोप लावून श्री संजय राठोड यांचे नाव घेऊन उलटसूलट बातम्या येत आहेत. जे निराधार आहेत.

आपण यासंबंधी पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत, आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या घटनेचा तपास वेगाने व्हावा. जे दोषी असतील त्यांच्यावर आपण निश्चितच कारवाई करतील याची खात्री आहे. आमच्या मुलीचा बळी गेला पण फक्त संशयावरून कोणाचाही बळी जाऊ नये. श्री संजय राठोड यांच्या राजीनामाची कोणतीही मागणी आम्ही केली नाही. आमची मुलगी गमावली परंतु याआड राजकारण करून दररोज होणाऱ्या आरोपांनी तिचा रोज बळी जात आहे. याचे राजकारण करून श्री संजय राठोड यांना आरोपी ठरवून राजीनामा घेऊ नका.

तपासामध्ये राठोड किंवा अन्य कोणीही दोषी असल्यास कठोर कार्रवाई करून न्याय द्यावा. परंतु संशयावरून मुलीवर किंवा कोणावर ही आरोप करू नये. श्री संजय राठोड हे समाजाचे नेते आहेत. ते खूप कष्ट करून इथपर्यंत पोहोचलो आहेत. फक्त संशयावरून त्यांचाही बळी घेऊ नये. तपास पूर्ण झाल्यावर दोषींवर कारवाई करावी. राजकारणामुळे व दबावाने घाईत निर्णय घेऊ नये. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आपण आम्हाला न्याय द्याल," असं पत्र पूजा चव्हाणच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांच्या हाती सोपवलं आहे.

First published:

Tags: शिवसेना