Home /News /mumbai /

'लज्जास्पद, ही शुद्ध फसवणूक', पेट्रोल-डिझेल दरकपातीवरून फडणवीसांचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र

'लज्जास्पद, ही शुद्ध फसवणूक', पेट्रोल-डिझेल दरकपातीवरून फडणवीसांचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र

प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही

प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही

प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही

    मुंबई, 23 मे :  पेट्रोल आणि डिझेलच्या  (Petrol Diesel Price) दरात मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री बसली आहे. अखेरीस केंद्र सरकारने (state government) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे. राज्य सरकारनेही पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी तर डिझेल 1 रुपये 44 पैशांनी स्वस्त करण्याची घोषणा केली आहे. पण, महाविकास आघाडी सरकारला निर्णय हा लज्जास्पद आहे, प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे., अशी टीका भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी केली. राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय जाहीर आहे. पण, देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून राज्य सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. लज्जास्पद. महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे, असं फडणवीस म्हणाले. 'महाराष्ट्रात पेट्रोलवर 2.08 रुपये आणि डिझेलवर 1.44 रुपये जे कमी झाले, तो रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस केंद्र सरकारने कमी केल्याने राज्याचा कर कमी झाला आहे. स्वत: काहीच करायचे नाही आणि केंद्राने घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचे सुद्धा श्रेय घ्यायचे, हे फारच गंभीर आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. (IPL 2022 : ..तर गुजरात न खेळताच फायनलमध्ये पोहोचणार, जाणून घ्या Play Off चे नियम) 'महाविकास आघाडी सरकारने लोकांना मुर्ख न बनविता तत्काळ पेट्रोल-डिझेल दरकपातीचा निर्णय घ्यावा, ही माझी पुन्हा मागणी आहे. कालची घोषणा पाहून ‘उंटाच्या तोंडात जिरे’ असे मी म्हटले होते. पण, प्रत्यक्षात तर हा संपूर्ण प्रकार मे महिन्यात ‘एप्रिल फूल’ करणारा ठरला, असा टोलाही फडणवीस यांनी सरकारला लगावला. केंद्र सरकारने काय घेतला निर्णय? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी "आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत असल्याची घोषणा केली. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी (Petrol Diesel Price) कमी होणार आहे. त्यानंतर राज्यानेही आज पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने शनिवार पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. (त्यांच्यामुळेच टीम इंडियात निवड झाली, 'यॉर्कर' सिंगने या 3 खेळाडूंना दिलं श्रेय) मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेंबर 2021 या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रती लिटर कर आकारात होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये अशी वाढ केली होती
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या