प्रियकराचा प्र'ताप', एटीएसला लावलं कामाला ; शालीमार एक्स्प्रेस स्फोटकं प्रकरणाचा लागला छडा

प्रियकराचा प्र'ताप', एटीएसला लावलं कामाला ; शालीमार एक्स्प्रेस स्फोटकं प्रकरणाचा लागला छडा

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनल्सवर शालिमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटकं सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

  • Share this:

अकोला, 06 जून : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनल्सवर शालिमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटकं सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. परंतु, या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. या प्रकरणी एका प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

आनंद वानखेडे असं या तरुणाचं नाव आहे. त्याला अकोल्यातून अटक करण्यात आली आहे. आनंदचं एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. पतीला पोलिसांच्या जाळ्यात अडकवण्याचा त्याचा डाव होता. यासाठी त्याने शालिमार एक्स्प्रेसमध्ेय फटाके ठेवले असल्याचं कबूल केलं. एटीएसच्या पथकानेही त्याचा पराक्रम ऐकून हैराण झाले.

काय घडलं नेमकं?

मुंबईसह संपूर्ण देशात काल रमजान ईद उत्साहात साजरी होत असताना लोकमान्य टिळक टर्मिनसवर (कुर्ला) शालिमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटक आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती. एक्स्प्रेसमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना एका बॅगमध्ये जिलेटिनच्या पाच कांड्या आढळल्यानं खळबळ उडाली. मुंबईत घातपाताचा कट तर नाही ना अशी भीती वर्तवली गेली.

बरं एवढंच नाहीतर जिलेटिनच्या कांड्यासोबत पोलिसांना एक पत्र सापडल. हिंदीत असलेल्या या पत्रात भाजप सरकारविरोधात मजकूर आहे. 'या भाजप सरकारला दाखवायचं दाखवून द्यायचं आम्ही काय करू शकतो. आमचा पंजा पडल्यावर काय होतं. तुम्हाला त्या चार जणांच्या संपर्कात राहायचं आहे. आम्ही काय करू शकतो हे आम्ही आताच दाखवून देऊ शकतो.' असा मजकूर या पत्रात होता.

उरणमध्ये खोपडी पुलावर धमकीचा मेसेज लिहणारा गजाआड

विशेष म्हणजे, मंगळवारीच उरणमध्ये मुंबईतल्या पेट्रोलियम आणि गॅस यासारख्या मोठ्या प्रकल्पांना उडवण्याच्या मजकूर लिहिल्याचं आढळून आलं होतं. त्यापाठोपाठ शालिमार एक्स्प्रेसमधल्या या प्रकारानं मुंबईत घातपाताचा कट आखला जातोय का? अशी भीती वर्तवली गेली. उरण प्रकरणी ३३ वर्षीय अमीर उल्लाह अजिउल्लाह शेख याला ताब्यात घेतलं आहे.  अमीर शेख हा मूळ सिद्धार्थ नगर, उत्तरप्रदेश येथील राहणारा असून मागील 10 वर्षांपासून तो खोपटा येथे भाडेकरू म्हणून रहात होता. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असून १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

==================

First published: June 6, 2019, 11:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading