Elec-widget

भाजपच्या माजी उपमहापौर शैलजा गिरकर यांचं निधन

भाजपच्या माजी उपमहापौर शैलजा गिरकर यांचं निधन

आजपर्यंत म्हणजे गेली २० वर्ष त्या भाजपच्या नगरसेविका आहेत. त्या अतिशय शांत स्वभावाच्या नगरसेविका होत्या. २०१२- २०१४ पर्यंत त्यांनी उपमहापौरपद भूषवलंय.

  • Share this:

प्रणाली कापसे, मुंबई, 10 सप्टेंबर :भाजपच्या नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा गिरकर यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. कांदिवली परिसरातील आॅस्कर हाॅस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. सध्या त्या कांदिवली परिसरातील वाॅर्ड क्रमांक २१च्या नगरसेविका होत्या. १९९७ पासून तर आजपर्यंत म्हणजे गेली २० वर्ष त्या भाजपच्या  नगरसेविका आहेत. त्या अतिशय शांत स्वभावाच्या नगरसेविका होत्या. २०१२- २०१४ पर्यंत त्यांनी उपमहापौरपद भूषवलंय.

शैलजा गिरकर या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी राहिल्या आहेत. त्या कर निर्धारण आणि संकलन या विभागात कामाला होत्या. १९९७ ला निवडणूक जिंकल्यावर त्यांनी राजीनामा दिला.

तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा. केवळ महिला आरक्षणातून नाही तर खुल्या प्रवर्गातून सुद्धा त्या निवडून आल्या होत्या. त्या मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा आणि स्थायी समिती सदस्य म्हणून ही काम पाहिलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2017 08:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...