S M L

शहीद मेजर राणे अनंतात विलीन, वडिलांनी दिला अग्नी

शहीद मेजर राणे हे अखेर अनंतात विलीन झाले आहेत.

Updated On: Aug 9, 2018 01:11 PM IST

शहीद मेजर राणे अनंतात विलीन, वडिलांनी दिला अग्नी

मुंबई, 09 ऑगस्ट : शहीद मेजर राणे हे अखेर अनंतात विलीन झाले आहेत. काही वेळापूर्वीच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद मेजर राणे यांच्या वडिलांनी त्यांना अग्नी दिला. यावेळी त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी आणि 2 वर्षाचा चिमुकलाही उपस्थित होता. अतिशय शोकाकुळ वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहीद राणे यांचे सर्व कुटुंबिय त्याचबरोबर संपूर्ण मिरा रोड परिसरातील रहिवाशी या ठिकाणी उपस्थित होते.

अग्नी देण्याआधी या वीरपुत्राला अखेरची लष्करी सलामी देण्यात आली. त्यांना गार्ड़ ऑफ ऑनर देण्यात आला आणि त्यानंतर अमर रहे अमर रहे... आणि जब तक सुरज चाँद रहेगा या घोषणांसह शहीद राणे यांना शेवटचा निरोप देण्यात आला. देशासाठी कशाचीही परवा न करता हे बलिदान व्यर्थ न जावो, याची काळजी घेणं हे समाज म्हणून आपलं कर्तव्य आहे. काहीच दिवसांत सण सुरू होतील, जगरहाटी सुरू होईलच. पण हे सगळं करत असताना या वीरपुत्राच्या घरी मात्र काय वातावरण असेल, याची जाणीव आपल्यातल्या प्रत्येकाला असायला हवी.

उत्तर काश्मीरमधल्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत चार जणांना वीरमरण आलं. यामध्ये मुंबईचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रसाद राणे शहीद झाले आहेत. शहीद मेजर केपी राणे हे मुंबईजवळील मीरारोड येथील रहिवासी होते. मेजर कौस्तुभ राणे मिरारोडच्या शीतल नगरमध्ये हिरल  इमारतमध्ये आपल्या कुटुंब बरोबर राहत होते. सहा वर्षापूर्वी राणे सैन्यात दाखल झाले. त्यांच्या पश्चात त्यांची आई, वडील, लहान ,बहीण, पत्नी आणि दोन वर्षांचा लहान मुलगा अगस्त्या असा परिवार आहे.

सोमवारपासून पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर वारंवार गोळीबार सुरू होता. यावेळी, सीमावर्ती भागात भारतातील 8 दहशतवादी घुसखोरी करताना आढळले. जेव्हा भारतीय सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार केला, तेव्हा त्यांनीही गोळीबार करण्यास सुरूवात केली. या हल्ल्यात चार भारतीय जवान शहीद झाले आहेत.

Loading...
Loading...

या ऑपरेशनमध्ये लष्कराच्या 36 राष्ट्रीय रायफल्स आणि  9 ग्रेनेडियर्स यांनी दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. लष्करी माहिती नुसार, अजूनही अनेक दहशतवादी या क्षेत्रात लपलेले आहेत. असं म्हटलं जातंय की, 2003च्या कराराच्या पहिल्यांदाच या क्षेत्रात पाकिस्तानसाठी मोर्टर्स वापरले जात आहेत. पाकिस्तानाच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी  भारतीय सैनिक देखील सतत गोळीबारही करत होते. पण या सगळ्यात आपण आपला एक वीरपूत्र गमावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2018 01:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close