मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई पोलिसांकडून शाहरुख खानच्या मॅनेजर पूजा ददलानींना समन्स, दिलं तब्येतीचं कारण

मुंबई पोलिसांकडून शाहरुख खानच्या मॅनेजर पूजा ददलानींना समन्स, दिलं तब्येतीचं कारण

अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani) यांना समन्स (summons) जारी केला आहे.

अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani) यांना समन्स (summons) जारी केला आहे.

अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani) यांना समन्स (summons) जारी केला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 08 नोव्हेंबर: मुंबई पोलिसांनी बॉलिवूड (manager of Bollywood actor Shah Rukh Khan) अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani) यांना समन्स (summons) जारी केला आहे. या समन्सवर उत्तर देताना पूजा ददलानी यांनी प्रकृतीची कारण देत मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) वेळ मागून घेतला आहे. पूजा ददलानी यांना शनिवारी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं होतं.

सध्या मुंबई पोलीस किरण गोसावी खंडणी प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाची चौकशी एनसीबी आणि मुंबई पोलीस करताहेत. तसंच एनसीबीची एसआयटी देखील यावर प्रकरणावर काम करत आहे.

हेही वाचा- पुणे हादरलं! पती रुग्णालयात असल्याचं कळताच साधला डाव; विवाहितेला गोठ्यात डांबून सामूहिक अत्याचार

शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीची गाडी CCTV मध्ये कैद

तीन दिवसांपूर्वी खंडणीचा आरोप झाल्याप्रकरणी तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या पथकाला महत्त्वाचं सीसीटीव्ही फूटेज (Mumbai Police get important cctv) मिळालं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या एसआयटी पथकाला मिळालेलं हे सीसीटीव्ही फूटेज लोअर परिसरातील आहे. या सीसीटीव्ही फूटेजमध्ये शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिची निळ्या रंगाची मर्सिडीज कार दिसत आहे. ज्या ठिकाणी ही मर्सिडीज कार दिसत आहे त्याच ठिकाणी 25 कोटींची खंडणीची डील झाली असल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सीसीटीव्ही फूटेजमध्ये निळ्या रंगाची मर्सिडीज दिसत आहे. त्यासोबतच शेजारी एक इनोव्हा कारही दिसत आहे. ही इनोव्हा पंच किरण गोसावी याची असल्याचाही पोलिसांना संशय आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे आता मुंबई पोलीस तपास करत आहेत. जर पुरावे मिळाले तर किरण गोसावी याच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा- Black sesame : हिवाळ्यात काळे तीळ खाण्याचे आहेत अनेक फायदे; त्वचा, केसांच्या समस्यांवरही गुणकारी

या सीसीटीव्ही फूटेजनंतर खंडणी प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. खरोखर खंडणी मागितली होती का? ही खंडणी कोणी मागितली होती आणि पैसे कोण घेणार होतं या सर्वांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

शाहरुख खानची मॅनेजर आहे तरी कोण?

ही व्यक्ती म्हणजे शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आहे. पूजा 2012 पासून शाहरुखची मॅनेजर आहे. पूडा शाहरूखच्या मुंबईतील मन्नत निवासस्थानी आयोजित केलेल्या सर्व पार्टी तसेच फॅमेली फंक्शनमध्ये दिसते. तसेच जेव्हा दिलीप कुमार यांचे निधन झाले तेव्हा शाहरूख सायरा बानो यांची भेट घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी देखील पूजा शाहरूखसोबत होती. यावरून ती शाहरूखच्या कुटुंबाच्या किती जवळची आहे हेच लक्षात येते.

हेही वाचा- मलिकांचा वानखेडेंच्या मेहुणीविरोधातला आरोप फोल?, समोर आली मोठी माहिती

पूजाच्या शाहरूख खानच्या कुटुंबासोबच प्रोफेशनल कनेक्शन नाही तर अनेकवेळा शाहरूखच्या घरच्या कार्यक्रमात दिसते. तसेच त्याच्या मुलासोबतचे फोटो देखील ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

पूजाची एकूण संपत्ती किती आहे ?

पूजा शाहरूखच्या चित्रपटासंबंधीत फक्त काम पाहत नाही तर ती त्याचे ब्रँड एंडोर्समेंट, शाहरूखची क्रिकेट टीम कोलकाता नाईट रायडर्सचे देखील काम पाहते. मिळालेल्या माहितीनुसार पूजा ददलानीची एकूण संपत्ती 6 दशलक्ष म्हणजेच 45 कोटी इतकी आहे.

First published:

Tags: Shah Rukh Khan